काही दिवसांपुर्वी श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघातीत २ सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. या मालिकेत पाहुण्या इंग्लंडने २-० ने यजमान श्रीलंकाचा व्हाईटवॉश केला होता. तर तत्पुर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमित २-१ च्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. यानंतर नुकतीच आयसीसीने जागतिक कसोटी गोलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत अंडरसनला मोठा फायदा झाला आहे. तर भारतीय गोलंदाजांनीही टॉप-१० मध्ये जागा मिळवली आहे.
इंग्लंडचा ३९ वर्षीय वेगवान गोलंदाज अंडरसन याने श्रीलंकाविरुद्ध फक्त दुसरा कसोटी सामना खेळला होता. मात्र या सामन्यात गोलंदाजी करताना एका डावात त्याने तब्बल ६ विकेट्स काढल्या होत्या. या कामगिरीमुळे गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. ८०७ गुणांसह त्याने सहाव्या स्थानावर ताबा मिळवला आहे. तर पुर्वी सहाव्या क्रमांकावर विराजमान असलेला कागिसो रबाडा एका स्थानाने घसरत सातव्या स्थानावर आला आहे.
भारतीय गोलंदाजांविषयी बोलायचे झाले तर, युवा गोलंदाजांसह अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. अश्विनने ३ कसोटी सामन्यात १२ विकेट्स काढल्या होत्या. तर बुमराहनेही ऑस्ट्रेलियाच्या ११ फलंदाजांना तंबूत धाडले होते.
या अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शनासह अश्विन आणि बुमराह कसोटी क्रमवारीतील आपापल्या स्थानावर कायम आहेत. अश्विन ७६० गुणांसह आठव्या व बुमराह ७५७ गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
https://twitter.com/ICC/status/1355427778703843329?s=20
फेब्रुवारीत सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका
विशेष म्हणजे, इंग्लंड संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ कसोटी, वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दौऱ्याची सुरुवात ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने होणार आहे. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १२ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळविण्यात येणार आहे. तर अखेरचे दोन सामने अहमदाबादच्या नवीन मोटेरा मैदानावर खेळवले जातील.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या ‘या’ धाकड फलंदाजाचे होतेय पुनरागमन
“असेच चालू राहिले तर मानसिक दृष्ट्या आजारी होतील विराट, अजिंक्य, रोहितसारखे क्रिकेटर”
८७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रद्द करण्यात आली रणजी ट्रॉफी स्पर्धा, ‘हे’ आहे कारण






