पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानला देण्यात आलंय. 1996 च्या विश्वचषकानंतर ही पाकिस्तानात खेळली जाणारी पहिली आयसीसी स्पर्धा असेल. देशातील सुरक्षा व्यवस्थेवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर अनेकदा टीका केली जाते. मात्र अखेर आयसीसीनं 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सुमारे 2 आठवड्यांपूर्वी आयसीसीकडे हे वेळापत्रक पाठवलं होतं. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान खेळले जाणार आहेत.
पाकिस्तानी चॅनल ‘जियो टीव्ही’च्या हवाल्यानं वृत्त मिळतंय की, आयसीसीनं प्रस्तावित वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही. या महिन्याच्या शेवटी उर्वरित 7 देशांच्या बोर्डांना स्पर्धेचं वेळापत्रक शेअर केलं जाईल. या स्पर्धेत पाकिस्तानसह भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.
प्रस्तावित वेळापत्रकानुसार, भारतीय संघाचे सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळले जातील. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना 9 मार्च रोजी होणार आहे. गद्दाफी स्टेडियमशिवाय नॅशनल स्टेडियम (कराची) आणि रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम (रावळपिंडी) येथे अन्य सामन्यांचं आयोजन केलं जाईल.
आयसीसीनं जरी या वेळापत्रकाला हिरवा झेंडा दाखवला असला, तरी बीसीसीआय मान्य यासाठी होकार देण्याची शक्यता फारच कमी आहे. गेल्या वर्षी खेळली गेलेली आशिया चषक स्पर्धा देखील पाकिस्तानात आयोजित करण्यात आली होती. मात्र भारतानं पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देखील असंच केलं जाण्याची शक्यता आहे. शक्यता आहे की, भारतीय संघाचे सामने युएईमध्ये खेळले जातील, तर अन्य संघांचे सामने पाकिस्तानात होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेचं सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं! इंग्लंडवर बाहेर पडण्याचा धोका
भारतीय संघाचा नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतीय संघाचं वेळापत्रक जाहीर, महाराष्ट्रात 5 सामने खेळले जाणार; पुण्यात किती सामन्यांचं आयोजन?