बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) कर चुकवल्याबद्दल आयसीसीने (आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) त्यांना ताकिद दिली आहे. याचा फटका भारताच्या 2021 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2023 विश्वचषकाच्या यजमान पदाला बसणार आहे.
बीसीसीआयने 2016च्या टी20 विश्वचषकाचा कर न दिल्याने आयसीसी 2021 आणि 2023 या दोन स्पर्धेचे भारताचे यजमान पद रद्द करू शकते. 23 मिलियन युएस डॉलर (160 कोटी रुपये) हा कर आयसीसीने आता बीसीसीआयला 31 डिसेंबरपर्यत भरण्यास सांगितला आहे. ही मागणी आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर जे आधी बीसीसीआयचे अध्यक्ष होते त्यांनी मांडली आहे.
2016च्या विश्वचषकासाठी भारतीय केंद्र आणि राज्य सरकारने करामध्ये कोणतीच सूट दिली नव्हती. तर आयसीसीचे सामने प्रसारण करणाऱ्या स्टार टीव्हीने पूर्ण कर भरला आहे. आयसीसीची मागणी पूर्ण करण्यासाठी बीसीसीआयकडे आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत.
क्रिकबझच्या माहितीनुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी या कर भरपाईबाबत अधिक माहिती आयसीसीला मागितली आहे.
हा कर बीसीसीआयने दिला नाही तर आयसीसी भारतीय संघाच्या वार्षिक महसूलमधून हा कर कापून घेण्यात येईल. पण जर आयसीसीने असे केले तर बीसीसीआय त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करणार आहे.
आयसीसी आणि बीसीसीआयच्या या वादामध्ये भारताचे 2021 आणि 2023 स्पर्धेचे यजमानपद मात्र धोक्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–पर्थ खेळपट्टीवरुन भारत-आॅस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंमध्येच झुंपली भांडणे
–मेलबर्न कसोटीआधी रविवारपर्यंत टीम इंडियाच्या सरावाला सुट्टी…
–आॅस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिका हा संघ जिंकणार, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी