येत्या १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचे आयोजन युएई आणि ओमानमध्ये करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी पात्रता फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. अशातच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. युएई संघातील दोन खेळाडू मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांना मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयसीसीने गुरुवारी (१ जुलै) युएई संघातील दोन खेळाडू, आमिर हयात आणि अशफाफ अहमद यांच्यावर आठ वर्षांसाठी निर्बंध लागू केले आहेत. हे दोघेही खेळाडू भारतीय बुकीसोबत मिळून आपल्याच देशात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने फिक्स करण्याच्या प्रयत्नात होते. ही गोष्ट त्यांनी स्वीकारली आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने या दोन्ही खेळाडूंवर १३ सप्टेंबर २०२० रोजी आरोप केले होते. त्यांची शिक्षा त्या दिवसापासूनच लागू होईल. (Icc bans uae players hayat Ahmed for accepting bribe from Indian bookie)
आयसीसीने म्हटले की, “हे निर्बंध १३ सप्टेंबर २०२० पासून लागू केले गेले आहेत. यावेळी त्यांना युएईमध्ये झालेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक पात्रता फेरी २०१९ शी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी अस्थायीरित्या निर्बंध लावण्यात आले होते. दोन्ही क्रिकेटपटूंनी भारतीय बुकीकडून संयुक्त अरब अमिरातीचे १५,००० दिरहम (जवळपास ४०८३ डॉलर) घेतले होते. पात्रता फेरी सामने फिक्स करणाऱ्या या सट्टेबाजाची ओळख मिस्टर ‘वाय’ स्वरूपात करण्यात आली आहे. हयात हा एक वेगवान गोलंदाज आहे तर अहमद एक फलंदाज आहे.”
आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने दोन्ही खेळाडूंवर ५ आरोप केले आहेत. ज्यात भ्रष्टाचार संपर्काचा उघड करण्यात अपयशी ठरणे, सामन्याच्या निकालावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे, ७५० डॉलरपेक्षा अधिक रकमेची भेट स्वीकार करणे यांचा समावेश आहे. तसेच आयसीसीने असेही म्हटले आहे की, या दोन्ही खेळाडू आणि भ्रष्टाचारींमध्ये व्हॉट्सॲपवर संवाद साधला गेला होता आणि ठरल्याप्रमाणे हे भेटलेही होते.
महत्वाच्या बातम्या-
टेनिस प्रेमी शास्त्री गुरुजी! फेडररचा सामना पाहण्यासाठी पोहोचले सेंटर कोर्टवर, ट्विट केले छायाचित्र
उर्वरित आयपीएल २०२१ चालू होण्यापूर्वी आरसीबीचा मोठा निर्णय; संघात झाली नव्या व्यक्तीची एन्ट्री