---Advertisement---

दुखापतीची आडकाठी; विश्वविजेता कर्णधार विलियम्सनची ‘या’ मोठ्या लीगमधून माघार

On: शुक्रवार, जुलै 2, 2021 8:29 AM
kane-williamson
---Advertisement---

न्यूझीलंडचा संघाचा विश्वविजेता कर्णधार केन विलियम्सन याच्या हाताच्या कोपाऱ्याची दुखापत पुन्हा एकदा वाढली आहे. त्यामुळे त्याने द हंड्रेड लीगच्या पहिल्यावहिल्या हंगामातून माघार घेतली आहे. या दुखापतीमुळे तो गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामना खेळू शकला नव्हता. विलियम्सनबरोबर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यानेही या लीगमधून माघार घेतली आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे वेगवान गोलंदाज शाहीन याने द हंड्रेड लीगच्या फिनिक्स संघातून आपले नाव मागे घेतले आहे. 27 जुलै ते 24 ऑगस्ट दरम्यान पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिज दौर्‍यावर असेल. याबरोबरच फिनिक्स संघाचा परदेशी खेळाडू अ‍ॅडम झंपा देखील या स्पर्धेतून माघार घेऊ शकतो. कारण वेस्ट इंडिज आणि बांगलादेशच्या मर्यादित षटकांच्या दौर्‍यासाठी तो ऑस्ट्रेलिया संघाचा भाग आहे.

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, विलियम्सनने बर्मिंघम फिनिक्स संघाबरोबर 110000 अमेरिकन डॉलर्स (सुमारे 81 लाख रुपये) चा करार केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून तो हाताच्या कोपऱ्याच्या दुखापतीचा सामना करत आहे. दुखापतीमुळे तो बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, आयपीएल 2021चा पहिला सामना आणि इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना खेळू शकला नव्हता. जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर तो अजूनही ब्रिटनमध्ये आहे.

विलियम्सनच्या जागी फिनिक्स फ्रँचायझीने न्यूझीलंडच्या फिन एलनचा समावेश केला आहे. यामुळे व्हिटॅलिटी ब्लास्टमध्ये लँकशायर संघाकडून खेळल्यानंतरही तो यूकेमध्ये राहणार आहे. टी20 क्रिकेट कारकिर्दीत सर्वाधिक स्ट्राईक रेट असणार्‍या अ‍ॅलनने लँकशायरच्या 8 डावांमध्ये 30.71 च्या सरासरीने आणि 138.70 च्या स्ट्राइक रेटने एकूण 215 धावा केल्या आहेत. यापूर्वी विलियम्सच्या नेतृत्वात न्यूझीलंड संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव केला होता.

महत्वाच्या बातम्या-

माजी क्रिकेटरचा छातीठोक दावा; म्हणाले, ‘शास्त्रीनंतर द्रविडच असणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक’

बड्या खेळाडूला सापडली टीम इंडियाची ‘कमजोर बाजू’, इंग्लंड घेणार भरपूर फायदा

टेनिस प्रेमी शास्त्री गुरुजी! फेडररचा सामना पाहण्यासाठी पोहोचले सेंटर कोर्टवर, ट्विट केले छायाचित्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---