भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने ६ जूलैै २०१९ ला श्रीलंकेविरुद्ध वनडे सामना खेळल्यानंतर वनडे क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोच्च गुण मिळवले होते. त्याने त्यावेळी ८८५ गुण मिळवले होते. त्यामुळे तो सार्वकालीन वनडे फलंदाजी क्रमवारीत पहिल्या २० खेळाडूंमध्ये आला.
सार्वकालीन वनडे फलंदाजी क्रमवारीत पहिल्या २० जणांमध्ये केवळ ३ भारतीय खेळाडू आहेत. यात रोहितसह विराट कोहली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून प्रत्येक कसोटी, वनडे किंवा टी२० सामना आणि मालिका संपल्यानंतर क्रमवारी जाहीर करण्यात येते. ही क्रमवारी ठरवताना खेळाडूंना मिळालेल्या गुणांच्या आधारे ठरवली जाते. त्यामुळे खेळाडूंचे गुण महत्तावाचे असतात.
या गुणांच्या आधारे सर्वकालीन क्रमवारीतही त्या खेळाडूची क्रमवारी ठरत असते. सर्वकालीन क्रमवारीत त्या खेळाडूचे स्थान ठरवताना त्या खेळाडूने कारकिर्दीत मिळवलेल्या सर्वोच्च गुणांचा विचार केला जातो.
आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये २६११ खेळाडू एकतरी सामना खेळले आहेत. यातील केवळ ११ खेळाडूंना सार्वकालीन वनडे फलंदाजी क्रमवारीत ९०० गुणांचा टप्पा पार करता आला आहे. भारतीय खेळाडूंमध्ये फक्त विराट कोहलीलाच हा कारनामा करता आला आहे. त्याने १२ जुलै २०१८ रोजी विराटने इंग्लंडविरुद्ध खेळताना ९११गुण मिळवले होता. तो या क्रमवारीत ६व्या स्थानी आहे.
या क्रमवारीत भारतीय खेळाडूंमध्ये विराटच्या पाठोपाठ सचिन तेंडुलकर आहे. सचिनने १३ नोव्हेंबर १९९८ ला झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सामन्यानंतर ८८७ गुण मिळवले होते. विराट आणि सचिन पाठोपाठ रोहित ८८५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे विराट, सचिन आणि रोहित व्यतिरिक्त कोणत्याच भारतीय क्रिकेटपटूला वनडे फलंदाजी क्रमवारीमध्ये ८५० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवता आलेले नाही.
टॉप १० खेळाडूंचे सार्वकालीन वनडे गुण (ICC Best-Ever ODI Championship Rating)
९३५ सर विवियन रिचर्ड्स (क्रमवारी -१)
९३१ झहीर अब्बास (क्रमवारी -२)
९२१ ग्रेग चॅपल (क्रमवारी -३)
९१९ डेव्हिड गॉवर (क्रमवारी -४)
९१८ डीन जोन्स (क्रमवारी -५)
९१० जावेद मिंयादाद (क्रमवारी -६)
९०९ विराट कोहली (क्रमवारी -७)
९०८ ब्रायन लारा (क्रमवारी -८)
९०२ एबी डिव्हिलियर्स (क्रमवारी -९)
९०१ हाशिम अमला (क्रमवारी -१०)
भारतीय खेळाडूंचे सार्वकालीन वनडे गुण
९०९ विराट कोहली (क्रमवारी- ७)
८८७ सचिन तेंडुलकर (क्रमवारी- १५)
८८५ रोहित शर्मा (क्रमवारी- १६)
८४४ सौरव गांगुली (क्रमवारी-२९)
८३६ एमएस धोनी (क्रमवारी-३२ )
८१३ शिखर धवन (क्रमवारी-४७ )
८११ मोहम्मद अझरुद्दीन (क्रमवारी-५० )
७८७ युवराज सिंग (क्रमवारी- ६७)
७८४ नवज्योत सिंग सिद्धू (क्रमवारी-६८ )
७७७ कपिल देव (क्रमवारी- ७४)
७७४ वीरेंद्र सेहवाग (क्रमवारी-७९ )
७५१ दिलीप वेंगसकर (क्रमवारी- ९५)