आयसीसी प्रत्येक कसोटी सामना व प्रत्येक वनडे व टी२० मालिका झाल्यावर क्रमवारी जाहीर करत असते. या क्रमवारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
क्रमवारी ही खेळाडूंची त्या कालखंडातील क्रमवारी दर्शवत असते. परंतु ही क्रमवारी ज्या गुणांच्या आधारे ठरवली जाते त्यांनाही तेवढेच महत्त्व असते. त्याला इंग्रंजी भाषेत रेटिंग असेही म्हणतात.
आयसीसीच्या संघासाठी असलेल्या क्रमवारीला तर विशेष महत्त्व असते. त्याच क्रमवारीच्या जोरावर आयसीसी संघांना दरवर्षी करोडो रुपयांचं बक्षीस देते.
१ एप्रिल रोजी जो संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असेल त्याला आयसीसीकडून १ मिलीयन डाॅलर व मेस अर्थात गदा दिली जाते. भारतीय संघाने २०१७, २०१८ व २०१९मध्ये ही गदा घेतलेली आहे.
याचप्रमाणे खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीलाही तितकेच महत्त्व असते. कसोटी क्रमवारीत आजपर्यंत सर्वात चांगले रेटिंग मिळविण्याचा पराक्रम क्रिकेटमधील आजपर्यंतचे सर्वश्रेष्ठ खेळाडू सर डाॅन ब्रॅडमन यांनी केला आहे. ते १० फेब्रुवारी १९४८ रोजी ९६१ रेटिंगसह अव्वलस्थानी पोहचले होते.
भारतीय खेळाडूंमध्ये केवळ विराट कोहलीने पहिल्या १० सार्वकालिन कसोटी क्रमवारी असलेल्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने २२ ऑगस्ट २०१८ रोजी ९३७ रेटिंगसह सार्वकालिन क्रमवारीत ११व्या स्थानावर झेप घेतली होती. पुढे विराटला यात सुधारणा करायची संधी होती. परंतु कामगिरी चांगली होऊनही तो यात पुढे गेला नाही.
सार्वकालीन फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये ३ ऑस्ट्रेलियाचे, ३ इंग्लंडचे, ३ वेस्ट इंडिजचे तर १ लंकेचा खेळाडू आहे.
भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली (११), तर सुनिल गावसकर यांनी २४व्या स्थानापर्यंत झेप घेतली होती.
सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये स्टिवन स्मिथ हा ९४७ रेटिंगसह दुसऱ्या स्थानापर्यंत गेला होता. ३० डिसेंबर २०१७ रोजी त्याने हा कारनामा केला होता. तेव्हाही स्मिथला सर डाॅन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्याची संधी चालुन आली होती. सध्या स्मिथ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असून त्याचे ९११ गुण आहेत.
आयसीसी सार्वकालिन कसोटी क्रमवारी (फलंदाजी)
१- ९६१ रेटिंग- सर डाॅन ब्रॅडमन, वि भारत १० फेब्रुवारी १९४८
२- ९४७ रेटिंग- स्टिवन स्मिथ, वि इंग्लंड ३० डिसेंबर २०१७
३- ९४५ रेटिंग- लेन ह्युटन, वि इंग्लंड ०३ एप्रिल १९५४
४- ९४२ रेटिंग- रिकी पाॅटींग, वि. इंग्लंड ०५ डिसेंबर २००६
४- ९४२ रेटिंग- जॅक हाॅब्ज, वि ऑस्ट्रेलिया २३ ऑगस्ट १९१२
६- ९४१ रेटिंग- पीटर मे, वि ऑस्ट्रेलिया २७ ऑगस्ट १९५६
७- ९३८ रेटिंग- व्हिव्हीयन रिचर्ड्स, वि इंग्लंड ३१ मार्च १९८१
७- ९३८ रेटिंग- गॅरी सोबर्स, वि भारत १७ जानेवारी १९६७
७- ९३८ रेटिंग- क्लाईड वाॅलकाॅट, वि ऑस्ट्रेलिया १५ जुन १९५५
७- ९३८ रेटिंग- कुमार संगकारा, वि इंग्लंड ५ डिसेंबर २००७
भारतीय खेळाडूंची फलंदाजीत आयसीसी सार्वकालिन कसोटी क्रमवारी
११- ९३७ रेटिंग- विराट कोहली, वि इंग्लंड, २२ ऑगस्ट २०१८
२४- ९१६ रेटिंग- सुनिल गावसकर, वि इंग्लंड ०३ सप्टेंबर १९७९
३३- ८९८ रेटिंग- सचिन तेंडूलकर, वि झिंबाब्वे, २५ फेब्रुवारी २००२
३७- ८९२ रेटिंग- राहुल द्रविड, वि पाकिस्तान, २० मार्च २००५
३९- ८८८ रेटिंग- चेतेश्वर पुजारा, वि श्रीलंका ७ ऑगस्ट २०१७
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेट विश्वविजेत्या भारताच्या ट्राॅफी नक्की आहेत तरी कुठं?
-४३ वर्षांपुर्वी २० युरोंसाठी तो मैदानात गेला थेट नग्न अवस्थेत
-काय सांगता! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर झोपेत चालायचा!