19 ते 22 जुलै दरम्यान आयसीसी बोर्डाची बैठक श्रीलंकेत झाली. या बैठकीला आयसीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय 108 आयसीसी सदस्यही बैठकीचा भाग होते. या चार दिवसीय बैठकीत 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केल्यास या खेळाची जास्तीत जास्त वाढ कशी होईल, यावर चर्चा करण्यात आली. याशिवाय आयसीसी बोर्डाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.
(1) 2024 टी20 विश्वचषक वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आला होता. वृत्तानुसार, या विश्वचषकामुळे आयसीसीचं नुकसान झालं आहे. विशेषत: न्यूयॉर्कमध्ये क्रिकेटचं आयोजन केल्यामुळे. त्यामुळे आयसीसीनं निर्णय घेतला आहे की, ते या टी20 विश्वचषक स्पर्धेचा रिव्ह्यू करतील. याची देखरेख रॉजर टूसे, लॉसन नायडू आणि इम्रान ख्वाजा हे करतील, जे वर्षाच्या शेवटी बोर्डाला अहवाल देतील.
(2) मुख्य कार्यकारी समितीनं पुष्टी केली आहे की, आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 साठी 8 प्रादेशिक पात्रता स्पॉट्समध्ये बदल करण्यात आले आहेत. आता दोन संघ अमेरिका आणि युरोपियन प्रदेशातून पात्र ठरतील, तर एक संघ अमेरिका खंडातून आणि तीन संघ आशिया आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशातून पात्र ठरतील.
(3) आयसीसीनं पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये समानता आणण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. आयसीसीनं जाहीर केलंय की, महिला टी20 विश्वचषक 2030 मध्ये 12 नाही तर 16 संघ खेळतील. याशिवाय महिला टी20 विश्वचषक 2026 ची कट ऑफ डेट 31 ऑक्टोबर 2024 असल्याचंही सांगण्यात आलंय.
(4) ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात यावा यावर आयसीसी आणि इतर सर्व बोर्डांचं आधीच एकमत झालं होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अर्थात IOC ने देखील 2028 च्या खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश केला जाईल, असं जाहीर केलं आहे. या बैठकीत ऑलिम्पिकच्या माध्यमातून क्रिकेटचा प्रचार कसा करता येईल, याबाबत चर्चा झाली.
महत्त्वाच्या बातम्या –
बांगलादेशच्या हातामधून निसटणार टी20 विश्वचषकाचे यजमानपद?
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे सामने घरबसल्या लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या
फक्त मैदानावरच नाही, तर बिझनेसमध्येही ‘किंग’ बनणार कोहली, हा आहे मास्टर प्लॅन!