खरंतर टी२० विश्वचषकाचे (T20 World Cup) आयोजन पुढील वर्षी होऊ शकत नाही. कारण वेळापत्रकाप्रमाणे पुढील वर्षी भारतात आधीपासूनच एका टी२० विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. अशामध्ये एका वर्षात एकाच क्रिकेट प्रकाराच्या २ विश्वचषकाचे आयोजन करणे योग्य होणार नाही. तसेच एका वर्षात २ टी२० विश्वचषकाच्या आयोजनाला प्रसारक (ब्रॉडकास्टर) आणि क्रिकेट बोर्डदेखील पाठिंबा देणार नाहीत.
अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयपीएलचे आयोजन झाले तर पुढील वर्षी एप्रिल २०२१मध्ये २ विश्वचषकांचे प्रसारण करणे कठीण होईल.
सौरभ गांगुलीचेही समर्थन?
असे म्हटले जात आहे की, टी२० विश्वचषक २०२२ पर्यंत स्थगित करण्याबद्दल बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आयसीसीचे (ICC) समर्थन करणार आहे. भारताला २०२३मध्ये वनडे विश्वचषकाचे यजमानपद सांभाळायचे आहे. तसं पाहिलं तर ३ वर्षात ३ विश्वचषक होतील. तर आयपीएलचे (IPL) आयोजनही होत राहिल. तरीही सध्या आयपीएलचे आयोजन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
अशाप्रकारे होणार फायदा-
कोविड-१९ व्हायरसमुळे (Covid-19) उद्भवलेल्या परिस्थितीत जर या विश्वचषकाला औपचारिक रुप दिले तर, या निर्णयामुळे सदस्यांना येत्या महिन्यांमध्ये द्विपक्षीय मालिकांचं नियोजन करण सोप्पं जाईल. हे केवळ सदस्य देशांशीच नाही तर प्रसारक स्टार स्पोर्ट्सशी निगडीत असलेलाही मुद्दा आहे. ज्याच्याकडे आयसीसी स्पर्धांचे तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) आणि आयपीएलचे प्रसारण हक्क आहेत.
सध्या आहेत ३ पर्याय-
१. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या विश्वचषकाचे आयोजन फेब्रुवारी-मार्चमध्ये करण्यात कोणतीही अडचण नाही. परंतु पुढील वर्षी एप्रिल महिन्यात आयपीएलचे आयोजन होणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा भारतीय दौरादेखील संकटात येऊ शकतो. तसेच प्रसारणकर्त्याचीही आपली बाजूही आहे
२. बीसीसीआय क्रिकेट ऑस्ट्रेलियाला २०२१च्या टी२० विश्वचषकाचे आयोजन करू देईल आणि २०२२मध्ये टी२० विश्वचषकाचे आयोजन भारतात करू शकेल. या कल्पेनेमध्ये कठीण गोष्ट अशी की, बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या वर्षाच्या शेवटी कसोटी मालिकेचे आयोजन करायचे आहे. एका जवळच्या सूत्राने सांगितले की, “असे कोणतेही कारण नाही ज्यामुळे बीसीसीआय टी२० विश्वचषकाची अदलाबदल करण्यास तयार होईल.”
३. ऑस्ट्रेलिया २०२० ऐवजी २०२२मध्ये विश्वचषकाचे आयोजन करेल. जर तसे झाले तर ते बऱ्याच खेळाडूंना, आयसीसीला आणि इतर सर्वांसाठी अनुकूल आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-काळजाचा थरकाप उडवणारे कसोटी क्रिकेटमधील फक्त ‘हे’ दोनच सामने सुटले बरोबरीत, भारतीय संघ
-३ असे क्रिकेटपटू; ज्यांचे मैदानावर जखमी होऊन झाले निधन, एक आहे भारतीय
-८० पेक्षा जास्त सामने खेळून एकही षटकार मारु न शकलेले ३ भारतीय क्रिकेटर