जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरु होऊन ४ दिवस झाले आहेत. परंतु आतापर्यंत केवळ १४१ षटकांचा खेळ झाला आहे. भारतीय संघ सामन्याच्या तिसर्या दिवशी २१७ धावांच्या धावसंख्येवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाने २ गडी गमावून १०१ धावा केल्या आहेत. राखीव दिवसासह सामन्यात आता केवळ २ दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत या सामन्याचा निकाल लागणे फार कठीण झाले आहे.
यामुळे कोणताही एक संघ विजेता होणेही जवळपास शक्य नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला या खास लेखात असे ३ पर्याय सांगणार आहोत, ज्याद्वारे आयसीसी अजूनही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एका विजेत्याची निवड करू शकतो.
अजून एक राखीव दिवस वाढवल्यानने लागू शकेल निकाल
जर निकाल पाच दिवसांनंतर लागला नसेल तर राखीव दिवस वापरला जाईल. मात्र, या सामन्याचा निकाल सहाव्या दिवशीही लागला नाही तर दोन्ही संघ संयुक्त विजेते मानले जातील. तथापि, आयसीसीने आणखी एक राखीव दिवस ठेवला, तर कदाचित क्रिकेटविश्वाला पहिल्यावहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला विजेता मिळेल.
इंग्लंडमध्ये जून महिन्यात खूप पाऊस पडतो. बऱ्याच वेळेस साऊथॅम्प्टनमध्येही पावसामुळे सामने रद्द झाल्याचे पाहिले गेले आहे. तरीही, या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतरही आयसीसीने इंग्लंडमध्येच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याचे नियोजन केले आहे. मात्र आयसीसीला हा अंतिम सामना इतर कोणत्याही देशात करता आला असता.
याखेरीज इंग्लंडमध्ये सामना पार पाडण्यासाठी आयसीसीनेही असा महिना निवडला आहे, ज्या महिन्यात इंग्लंडला सर्वाधिक पाऊस पडतो. आता जर आयसीसीला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाचा विजेता हवा असेल, तर ७ व्या दिवसाचा राखीव दिवसदेखील एक चांगला पर्याय असेल.
पॉंइट्स ऑफ परसेंटेजनुसार निवडू शकता विजेता
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला. न्यूझीलंडच्या संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत एकूण ४२० गुण मिळवले आणि ७० टक्के गुणांसह अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला.
त्याचबरोबर घरच्या मालिकेत इंग्लंडचा ३-१ ने पराभव करून अंतिम सामन्यासाठी भारताने पात्रता मिळविली होती. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पॉईंट टेबलमध्ये भारताला ५२० गुण आणि ७२.२ गुणांची टक्केवारी मिळाली असून त्यांनी ६ कसोटी मालिकांपैकी एकूण ५ मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे आयसीसीला विजेता निवडायचा असेल तर टक्केवारी व गुणांच्या आधारे त्यांनी विजेता म्हणून भारतला निवडले पाहिजे.
दोन्ही संघ एकाच डावात विजेता ठरवता येतील
कसोटी सामन्यात दोन्ही संघांना २-२ डाव मिळतात. तथापि, आयसीसीला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाचा विजेता हवा असल्यास आता आयसीसीने दोन्ही संघांना प्रत्येकी एका डावाच्या खेळीने निकालासाठी पटवून दिले पाहिजे.
पहिल्या डावात ज्याने अधिक धावा केल्या त्याला विजयी घोषित केले जावे. अजून सामन्याचे २ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या पर्यायानुसार विश्व कसोटी स्पर्धेचा विजेता नक्कीच सापडेल. अशा परिस्थितीत भारताला विजयासाठी ८ विकेट घ्याव्या लागतील आणि न्यूझीलंडला विजयासाठी ११७ धावा कराव्या लागतील.
महत्वाच्या बातम्या
WTC अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात पंत सपशेल फ्लॉप, केली ३ वर्षांपुर्वीच्या चुकीची पुनरावृत्ती
सोडा-चखण्याचा बंदोबस्त झालाय! सिराजच्या ‘त्या’ फोटोमुळे गुरुजींवरही बनले भन्नाट मीम्स
बुमराहच्या गोलंदाजीवर दिग्गजाने उपस्थित केले प्रश्न, गेल्या १०५ षटकांत घेतल्यात फक्त ७ विकेट्स