वनडे क्रिकेटचे भवितव्य धोक्यात अशा प्रकारची काही धक्कादायक विधाने माजी क्रिकेटपटू करत आहे. वाढत्या टी२० लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनेही (आयसीसी) वनडेच्या भविष्यातील मालिकांबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ज्योफ एर्लाडिस (Geoff Allardice) यांनी म्हटले, “व्यस्त फ्युचर टूर प्रोग्राममुळे (एफटीपी) तिरंगी मालिकेचे आयोजन करणे अवघड वाटत आहे.”
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यानेही जर मालिका अधिक देशांची मिळून आयोजित केली तर त्याची लोकप्रियता वाढेल. सध्या अनेक देश द्विपक्षीय मालिका खेळत आहेत. मात्र पहिल्यासारख्या तिरंगी किंवा चौरंगी मालिका होताना दिसत नाही.
एर्लाडिस पुढे म्हणाले, “चार देशांमध्ये मालिका आयोजित करणे जमत नाही, मात्र तिरंगी मालिका खेळल्या जाऊ शकतात. पण सध्या तिरंगी मालिकांचे आयोजन करणेही जवळ-जवळ अनिश्चित वाटत आहे. कारण एटीफीमध्ये तिरंगी मालिकेचे तसे काही नियोजन करण्यात आले नाही.”
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतरच वनडे क्रिकेट धोक्यात आले आहे या चर्चेला जोर धरला आहे. त्याने निवृत्तीचे कारण सांगताना म्हटले, व्यस्त वेळापत्रकामुळे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळणे शक्य नाही.
इंग्लंडचा मर्यादीत षटकाचा कर्णधार जोस बटलर आणि ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने स्टोक्सच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले, क्रिकेटच्या कारकिर्दीसोबत कुटुंबासोबत वेळ व्यतित करणे आणि क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळणे हे अशक्य आहे.
एकीकडे पाकिस्तानचा वसिम अक्रम आणि भारताचे अष्टपैलू रवी शास्त्री यांनी टी२० लीगचे समर्थन केले आहे. तेव्हाच वनडे क्रिकेट आणि मालिकांवर प्रश्न निर्माण झाले. “पुढच्या एटीफीमध्ये (२०२३-२७) अधिक वनडे सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये काही बदल होणार नाही. वनडे क्रिकेट धोक्यात अशी काही स्थितीही नाही,” असे म्हणत एर्लाडिस यांनी वनडेचे भविष्य धोक्यात नाही हे स्पष्ट केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तुफान फॉर्मात अससेल्या आझमची ‘या’ नवख्या गोलंदाजापुढे होतेय सिट्टी पिट्टी गुल, बघा कोण आहे तो?
त्रिनिदादमध्ये भारताचे जास्त सामने घेतल्याने संतापला कॅरेबियन दिग्गज; म्हणाला, “काय गरज होती ?”