लाईव्हदरम्यान, पंतने काही चाहत्यांना देखील बोलण्याची संधी दिली. पंत या चाहत्यांसोबत मजेशीर चर्चा करून त्यांचे मनोरंजन करतण्याचा प्रयत्न करत होता. पण रोहित मात्र वेगळ्याच विचारात होता. रोहित लाईव्हमध्ये जोडल्या गेलेल्या चाहत्यांचीच फिरकी घेत असल्याचे पाहायला मिळाले.

खेळाडूंच्या या लाईव्हमध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे एमएस धोनी. पंतने धोनीची पत्नी साक्षीला लाईव्हमध्ये जोडले. लाईव्ह आल्यानंतर साक्षीने मोबाईल धोनीकडे केला आणि चाहत्यांना त्याची एक झल दिसली. धोनीने चाहत्यांकडे पाहून ‘हॅलो’ देखील केले. कदाचीत ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा धोनी एखाद्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये चाहत्यांसमोर आला आसेल. त्याची एक झलक पाहिल्यामुळे चाहते खुश झाल्याचे दिसत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

हा माजी भारतीय क्रिकेटर म्हणतोय,”सात-सात तास वनडे क्रिकेट कोण पाहणार?”

प्रेग्नेंसीनंतर ‘ही’ भारतीय महिला क्रिकेटर परतणार मैदानावर, बनणार पहिलीच क्रिकेटर

शास्त्री म्हणतायेत, “सचिनसारखा किडा आत्ताच्या टीम इंडियातील कोणातच नाही”