---Advertisement---

आयसीसीचे अध्यक्ष जय शहा कुटुंबासह कुंभमेळयात, घेतला संतांकडून आशीर्वाद, पाहा VIDEO

On: मंगळवार, जानेवारी 28, 2025 10:48 AM
Jay Shah
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) विद्यमान अध्यक्ष जय शहा त्यांच्या कुटुंबासह प्रयागराजला पोहोचले आहेत. 2025 च्या महाकुंभमेळ्यासाठी ते प्रयागराजला पोहोचले आहेत. जय शहा प्रयागराजला पोहोचल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात जगभरातून भाविक पोहोचत आहेत. ज्यामध्ये जय शहा देखील सामील झाले.

आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी सचिव जय शहा प्रयागराजमध्ये आल्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेद्वारे शेअर करण्यात आला. प्रयागराजमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. स्वागतानंतर त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांशीही संवाद साधला. यावेळी आयसीसी अध्यक्ष भगव्या रंगाच्या पोशाखात दिसले.

महाकुंभात पोहोचण्यापूर्वी जय शहा अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात पोहोचले होते. जिथे त्यांनी प्रार्थना केली. आता ते त्यांच्या कुटुंबासह प्रयागराजला पोहोचले आहेत. जिथे ते महाकुंभात सहभागी होतील. जय शहा यांनी त्यांच्या कुटुंबासह हनुमानगढी मंदिरालाही भेट दिली.

जय शहा यांनी 1 डिसेंबर 2024 पासून आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारली होती. या पदसाठी ते आधीच निवडून आले होते. ग्रेग बार्कलीची जागा जय शाहने घेतली. ते 2020 पासून आयसीसी अध्यक्षपद भूषवत होते. त्यांनी आयसीसीला स्पष्ट केले होते की ते तिसरे टर्म घेणार नाहीत.

जय शहा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्या सत्रात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीने अध्यक्षपदासाठी अर्ज मागवले. परंतु जय शहा वगळता कोणीही या पदासाठी अर्ज केला नाही. त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली. जय शहा यांनी वयाच्या 36 व्या वर्षी जबाबदारी स्वीकारली आणि सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मानही मिळवला.

हेही वाचा-

IND VS ENG; तिसऱ्या टी20 सामन्यातूनही मोहम्मद शमी वगळला जाणार? पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
13 वर्षांनंतर रणजीमध्ये विराट कोहलीचे कमबॅक, या संघाविरुद्ध अ‍ॅक्शनमध्ये दिसणार
रणजी ट्राॅफीच्या शेवटच्या लीग सामन्यात नाही खेळणार रोहित, जयस्वालसह ‘हे’ स्टार खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---