आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकावर चर्चा करत आहे. भारतानं पाकिस्तानात येण्यास नकार दिल्यानंतर संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानबाहेर आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी दक्षिण आफ्रिकेचा पर्याय असू शकतो. दरम्यान, आयसीसीनं 11 नोव्हेंबर रोजी लाहोर येथे होणाऱ्या या स्पर्धेचं प्रक्षेपण वेळापत्रक पुढे ढकललं. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, पीसीबी ही स्पर्धा देशाबाहेर, अगदी संयुक्त अरब अमिरातीमध्येही (यूएई) आयोजित करण्यास तयार नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (पीसीबी) आयसीसीला सांगितलं आहे की, देशात सुरक्षा हा मुद्दा नाही. त्यांनी अलीकडेच इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकांचं यशस्वी आयोजन केलं. गेल्या वर्षी आशिया चषकाप्रमाणे ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये ही स्पर्धा न घेण्याच्या भूमिकेवर पाकिस्तान ठाम आहे. त्यावेळी भारताचे सामने श्रीलंकेत झाले होते. आयसीसीनं अद्याप पीसीबीला प्रतिसाद दिलेला नाही. ते सहभागी संघांशी याबाबत चर्चा करत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांनी 2012 पासून द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. मात्र गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकासह अन्य आयसीसी स्पर्धांमध्ये संघ एकमेकांसमोर आले आहेत. उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षी पाकिस्ताननं आयोजित केलेल्या आशिया चषकालाही हायब्रीड मॉडेलमध्ये बदलण्यात आलं होतं. तेव्हाही भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर भारताचे सर्व सामने (फायनलसह) श्रीलंकेत खेळवण्यात आले.
2017 नंतर प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन होत आहे. मात्र ही स्पर्धा ‘हायब्रीड’ मॉडेलमध्येच आयोजित केली जाऊ शकते. भारतीय संघ शक्यतो आपले सामने युएईमध्ये खेळू शकतो. उर्वरित देशांची सामने पाकिस्तानात आयोजित करण्यात येतील. पाकिस्तानच्या प्रतिष्ठित ‘डॉन’ वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी हायब्रीड मॉडेलची शक्यता नाकारली आहे. यामुळे आयसीसीला संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर हलवण्यास भाग पाडलं जाऊ शकतं.
हेही वाचा –
गुजरात टायटन्सचा मोठा निर्णय! तीन वेळच्या आयपीएल विजेत्याला सहाय्यक कोच म्हणून नियुक्त केले
पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी जगातील नंबर 1 गोलंदाज! जसप्रीत बुमराहचं स्थान कितवं?
अर्जुन तेंडुलकरचा गोलंदाजीत कहर! आयपीएल मेगा लिलावापूर्वी केली आश्चर्यजनक कामगिरी