यंदाचा आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) संपल्यानंतर चाहत्यांचं लक्ष्य नक्कीच आगामी चॅम्पियन ट्राॅफीवर (Campion Trophy) असेल. आयसीसी चॅम्पियन ट्राॅफी 2025 मध्ये फेब्रुवारी, मार्च या महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. चॅम्पियन ट्राॅफीचे यजमान, पाकिस्ताननं या स्पर्धेसाठी त्यांची योजना आणि संभावित वेळापत्रक आयसीसीकडं पाठवलं आहे. आगामी चॅम्पियन ट्राॅफीमध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत. पाकिस्ताननं 2017ला भारतीय संघाचा धुव्वा उडवून चॅम्पियन ट्राॅफीवर त्यांचं नाव कोरलं होतं.
आयसीसी चॅम्पियन ट्राॅफी 8 वर्षांनंतर खेळली जाणार आहे. 2017 नंतर प्रथमच आयसीसी चॅम्पियन ट्राॅफीचं आयोजन केलं जात आहे. क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार जर पाकिस्तानच्या योजनेला आयसीसीनं अनुमती दिली तर, 2025च्या चॅम्पियन ट्राॅफीचे 15 सामने फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान म्हणजेच रमजान महिन्यात खेळले जातील.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) नियोजनानुसार चॅम्पियन ट्राॅफीचे 15 सामने तीन शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. फायनलसहित सर्वाधिक 7 सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. तर 5 सामने रावलपिंडी आणि 3 सामने कराची येथे खेळले जाणार आहेत. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार भारत आणि पाकिस्तान सामना लाहोरमध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी चॅम्पियन ट्राॅफीमध्ये भारत-पाकिस्तान दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
तत्पूर्वी 1996 नंतर पाकिस्तानसाठी ही पहिलीच संधी आहे, की ते आयसीसीच्या एखाद्या स्पर्धेचे यजमान आहेत. 1996 मध्ये भारत आणि पाकिस्तान विश्वचषकाचे संयुक्त यजमान होते. त्यानंतर भारतामध्ये एकदिवसीय आणि टी20 फाॅरमॅटचे तिनही विश्वचषक झाले आहेत. 1996 नंतर पाकिस्तानमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेची खात्री नसल्यानं त्यांना आयसीसीनं स्पर्धेचं यजमान होण्यासाठी नकार दिला होता आणि भारतीय संघासोबतच काही संघ खूप दिवसांपासून पाकिस्तानच्या दौऱ्यावर खेळण्यासाठी गेले नाहीत.
2025च्या चॅम्पियन ट्राॅफीसाठी आठ संघ- भारत, पाकिस्तान (यजमान), बांगलादेश, न्यूझीलँड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी: पराभवानंतर सिक्युरिटी गार्डकडून एका पाकिस्तानी युट्यूबरचा खून…!
पाकिस्ताननं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
काय सांगता! कॅनडाच्या खेळाडूंना पंजाबी बोलणं पडतं महागात






