---Advertisement---

पाकिस्ताननं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

Canada vs Pakistan
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World cup) 22वा सामना आज (11 जून) रोजी पाकिस्तान विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. कॅनडानं यंदाच्या विश्वचषकात दोन सामने खेळून एक सामना जिंकला आहे. तर पाकिस्तान यंदाच्या विश्वचषकात विजयाचं खातही उघडू शकला नाही. पाकिस्तानची धुरा बाबर आझमच्या (Babar Azam) हाती आहे. बाबरच्या सेनेचा पहिल्याच सामन्यात यजमान अमेरिकेनं धुव्वा उडवला होता. तत्पूर्वी पाकिस्ताननं टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

पाकिस्तान- मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सैम अयुब, बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अमीर

कॅनडा- आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा(यष्टीरक्षक), रविंदरपाल सिंग, साद बिन जफर(कर्णधार), डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन

पाकिस्तान आणि कॅनडाच्या संघासाठी आजचा सामना जिंकणं अत्यंत महत्वाच असणार आहे. ज्या संघाचा पराभव होईल त्या संघासाठी ‘सुपर 8’ मध्ये क्वालिफाय होण्याचं दरवाजं बंद होणार आहेत. दोन्ही संघ यंदाच्या टी20 विश्वचषकात ग्रुप-अ मध्ये समाविष्ट आहेत. त्यामध्ये भारत गुणतालिकेत शीर्ष स्थानी आहे. तर यजमान अमेरिका दुसऱ्या स्थानावर आणि कॅनडा तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तान सध्या चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा सामना खूप निर्णायक ठरणार आहे.

दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासात कॅनडा आणि पाकिस्तान 2008 साली भिडले होते. त्यावेळी पाकिस्ताननं 35 धावांनी कॅनडाचा पराभव केला होता. परंतु टी20 विश्वचषकामध्ये हे दोन्ही संघ प्रथमच भिडत आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता! कॅनडाच्या खेळाडूंना पंजाबी बोलणं पडतं महागात
पॅरिसमध्येही एमएस धोनीची क्रेझ! चाहता भेटता क्षणीच पडला पाया
यांच्यासाठी वय हा फक्त आकडा! टी20 विश्वचषकातील 4 सर्वात वयस्कर खेळाडू, ज्यांचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---