पाकिस्तानने आज ८ विकेट्सने यजमान इंग्लंड संघावर विजय मिळविला. यजमान इंग्लंड अगदी सामन्यापूर्वीही विजेतेपदाची सर्वात जास्त प्रबळ दावेदार समजले जात होते तर आयसीसी क्रमवारीत तळाला असणाऱ्या पाकिस्तान संघाकडून कुणालाही विशेष अशा अपेक्षा नव्हत्या. परंतु जबदस्त गोलंदाजीच्या जोरावर या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयाबरोबर काही विश्वविक्रमही पाहायला मिळाले. त्यातील निवडक
#१ हसन अली पहिला पाकिस्तानी खेळाडू बनला ज्याने एका चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन सामनावीर पुरस्कार मिळविले.
#२ आयसीसीच्या १८ एकदिवसीय (११ विश्वचषक आणि ८ चॅम्पियन्स ट्रॉफी ) स्पर्धा खेळून इंग्लंडला एकही स्पर्धा जिंकता आली नाही.
#३ इंग्लंडच्या पराभवाबरोबरच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये सर्व संघ एकतरी सामना हारले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड संघाला एकही विजय मिळविता आला नाही.
#४ दुसऱ्यांदाच दोन आशियायी संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत विजेतेपदासाठी खेळणार. यापूर्वी २००२ मध्ये भारत आणि श्रीलंका संघ अंतिम फेरीत पोहचले होते.
#५ पाकिस्तान आजपर्यंत १९९२ विश्वचषक, १९९९ विश्वचषक, २००७ टी२० विश्वचषक, २००९ टी२० विश्वचषक, २०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीने आयोजित स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत पोहचले आहे.
#६ पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत खेळणारा ८ वा संघ बनला आहे.
#७ आयसीसी क्रमवारीत पाकिस्तान सध्या ८व्या क्रमांकावर आहे.
#८ १९९९ नंतर प्रथमच पाकिस्तानने आयसीसीने आयोजित केलेल्या कोणत्याही एकदिवसीय स्पर्धामंध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.