---Advertisement---

टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनल आणि फायनलसाठी आयसीसीने बदलले नियम; पाऊस आला तर असा ठरणार विजेता

On: शुक्रवार, नोव्हेंबर 4, 2022 4:50 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाचा अखेरचा आठवडा सुरू झाला आहे. साखळी फेरीतील केवळ चार सामने शिल्लक असले तरी, न्यूझीलंड वगळता अद्याप तीन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होणे बाकी आहे. असे असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पर्धेच्या उपांत्य फेरी व अंतिम सामन्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या विश्वचषकातील अनेक सामन्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. दक्षिण आफ्रिका संघाला दोन सामन्यात पावसामुळे नुकसान सहन करावे लागले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हा बहुप्रतीक्षित सामना देखील पावसामुळे रद्द करावा लागला होता. तसेच पावसामुळे लागू केल्या गेलेल्या डकवर्थ लुईस नियमामूळे सामन्यांना निर्णायक कलाटणी मिळालेली दिसून आली. ऑस्ट्रेलियात पावसाचे दिवस असल्याने येथे विश्वचषक आयोजित कसा केला गेला असा प्रश्न देखील अनेक जण विचारत आहेत.

या सर्व नाट्यमय घडामोडींच्या दरम्यानच आयसीसीने स्पर्धेच्या उपांत्य फेरी व अंतिम फेरीसाठी नवे नियम लागू केले आहेत. आयसीसीच्या नियमानुसार कोणताही टी20 सामना हा दोन्ही संघांनी कमीत कमी पाच षटके खेळल्यानंतरच पूर्ण होऊ शकतो. परंतु, 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू केल्या गेलेल्या नव्या नियमानुसार आयसीसी टी20 विश्वचषकातील बाद फेरीच्या सामन्यांमध्ये सामना पूर्ण होण्यासाठी दोन्ही संघांनी प्रत्येकी 10 षटके फलंदाजी करणे आवश्यक आहे.

उपांत्य फेरी व अंतिम फेरीसाठी राखीव दिवस देखील ठेवण्यात आले आहेत. सामन्याच्या मुख्य दिवशी खेळ पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशी, ज्या ठिकाणी पहिल्या दिवसाचा खेळ थांबलेला तेव्हापासून सामना सुरू होईल. उपांत्य फेरीचे सामने पूर्णच होऊ शकले नाही तर, साखळी फेरीत अव्वल असलेला संघ अंतिम फेरीत मजल मारेल. अंतिम फेरीचा सामना देखील पूर्ण न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद बहाल केले जाईल. यापूर्वी अखेरच्या वेळी 2002 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत व श्रीलंका संघाला संयुक्त विजेतेपद दिले गेलेले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट सूर्या अन् डिविलियर्ससारखे फँसी शॉट्स का खेळत नाही? कारण समजताच तुम्हीही व्हाल कोहलीचे फॅन
किवी संघाची टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर एंट्री, न्यूझीलंडचा आयर्लंडवर 35 धावांनी विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---