ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज मार्व ह्यूज हे आज (२३ नोव्हेंबर) त्यांचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहेत. १९८५ ते १९९४ या कालावधीत ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे प्रतिनिधित्त्व केलेले ह्यूज यांच्या वाढदिवसानिमित्त आयसीसीने त्यांना अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. झुपकेदार मिशा ठेवण्याची आवड असलेले ह्यूज यांना आयसीसीने त्यांच्या मिशांवरुनच शुभेच्छुक संदेश दिला आहे. आयसीसीच्या या शुभेच्छापर पोस्टची भरपूर चर्चा होत आहे.
आयसीसीने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन ह्यूजेस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले की, ‘क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब मिश्या? वाढदिवसाच्या शुभेच्छा मर्व ह्यूज!’
The greatest moustache in cricket history? 🥸
Happy birthday, Merv Hughes! 🍰 pic.twitter.com/e0S7CKGhQk
— ICC (@ICC) November 22, 2021
यानंतर आयसीसीच्या या पोस्टवर बऱ्याचशा प्रतिक्रिया उमटत आहेत. काही चाहत्यांनी ट्वीट करत भारतीय वायुसेनेचे पायलट अभिनंदन यांचा फोटो शेअर करत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अभिनंदन यांना विमानचा अपघात झाल्यांतर पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना सोडून टाकण्यात आले होते.
अभिनंदन यांच्या मिशाही ह्यूज यांच्याप्रमाणे मोठ्या आणि झुपकेदार आहेत. त्यामुळे एका चाहत्याने त्यांचा फोटो शेअर मजेशीर प्रतिक्रिया दिली आणि सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने लिहिले आहे की, ‘माझ्याविषयी काय, एक अष्टपैलू अभिनंदन!!’
Whatabout Me, An all-rounder Abhinandan!! pic.twitter.com/okcTZiXoZd
— Tom Fordy (@PromoterBoxing) November 23, 2021
अशी राहिली ह्यूज यांची क्रिकेट कारकिर्द
दरम्यान ह्यूज यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास, त्यांची कारकिर्द छोटी पण अतिशय उल्लेखनीय राहिली आहे. १९८५ मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर ५३ कसोटी सामने खेळताना त्यांनी २१२ विकेट्स आणि १०३२ धावा केल्या होत्या. तसेच ३३ वनडे सामन्यांमध्ये त्यांनी ३८ विकेट्स आणि १०० धावा केल्या होत्या.
त्यातही वर्ष १९९३ मधील ऍशेस मालिकेत त्यांचे प्रदर्शन अतिशय शानदार राहिले होते. या कालावधीत त्यांनी ६ कसोटी सामन्यांमध्ये जवळपास ३०० षटके गोलंदाजी केली होती आणि ३१ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्या या प्रदर्शनाच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने ही मालिका ४-१ अशी जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
हॉटेलमध्ये घंटानाद आणि घुंगरांसह रामभजन, भारत-न्यूझीलंड क्रिकेटपटूंचे कानपूरमध्ये अनोखे स्वागत
“रिषभ त्याची जबाबदारी समजण्यात ठरला अपयशी”; दोन दिग्गजांनी घेतले निशाण्यावर
टीम पेनचा राजीनामा, आता ‘हे’ ३ खेळाडू होऊ शकतात ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचे नवे कर्णधार