कोलकाता | आयसीसीने आज २०१९ ते २०२३ या ५ वर्षांचा भविष्यातील कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यात २०२१ ला होणारी चॅपियन्स ट्राॅफी रद्द करुन त्याऐवजी एक टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.
हा टी२० विश्वचषक भारतात होणार असून त्यात १६ संघ सहभागी होणार आहेत. सर्वानूमते या विश्वचषकात १६ संघांना संधी देण्याचे ठरले आहे. यापुर्वी या विश्वचषकात केवळ ८ संघ सहभागी होत होते.
भारतीय क्रिकेट बोर्डानेही या बदलाला पाठींबा दिला आहे. यापुर्वी भारताने याचा कडाडून विरोध केला होता.
टी२० विश्वचषक सलग दोन वर्ष होण्याची ही केवळ दूसरी वेळ असणार आहे. यापुर्वी २००९ आणि २०१० या दोन वर्षा सलग हे विश्वचषक झाले होते.
तसेच यावेळी आयसीसी कसोटी चॅंपियनशीपची यात घोषणा करण्यात आली. आयसीसीच्या या ५ वर्षाच्या कार्यक्रमात तब्बल ६ विश्वचषक होणार आहेत. त्यात दोन कसोटी चॅंपियनशीप, दोन ५० षटकांचे विश्वचषक तसेच दोन टी२० विश्वचषकांचा समावेश आहे.
कसोटी चॅंपियनशीप दोन वर्ष खेळवून फायनल ही २०२१ तसेच २०२३ मध्ये होणार आहे. यामुळे एकप्रकारे कसोटीचेही दोन विश्वचषक या काळात होणार आहेत.
पहिली कसोटी चॅंपियनशीपशीप २०१९ ते २०२१ या काळात होणार आहे तर दुसरी कसोटी चॅंपियनशीप २०२१ ते २०२३ या काळात होणार आहे. २०२३ च्या ५० षटकांचा विश्वचषकच्या पात्रता फेऱ्या २०२० ते २०२२ या काळात होणार आहेत.
आयसीसीच्या पुढील ५ वर्षातील महत्वाच्या स्पर्धा
२०१९- ५० षटकांचा विश्वचषक
२०२०- २० षटकांचा विश्वचषक
२०२१- २० षटकांचा विश्वचषक
२०२१- कसोटी चॅंपियनशीप फायनल
२०२३- ५० षटकांचा विश्वचषक
२०२३- कसोटी चॅंपियनशीप फायनल
महत्त्वाच्या बातम्या –
-अबब! पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप
-संपूर्ण वेळापत्रक: असे होतील भारताचे विश्वचषक 2019चे सामने
-यारे या सारे या! आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने
-ना धोनी- ना विराट, आयपीएलमध्ये हवा तर याच खेळाडूची
-धोनी चाहत्यांसाठी ही आहे महत्त्वाची आकडेवारी
-या कारणामुळे विराटला झाला 12 लाख रूपयांचा दंड
-बीसीसीआयची फसवणूक करणारा खेळाडू आयपीएलमध्ये चमकला
-पराभव झाला तरीही हा विक्रम करत कोहली भाव खाऊन गेला
-असा एक कारनामा ज्यासाठी टी२०मध्ये खेळाडू करतात जिवाचे रान