---Advertisement---

२०१९च्या विश्वचषकाआधी टीम इंडिया या संघाविरुद्ध खेळणार सराव सामने

On: शुक्रवार, फेब्रुवारी 1, 2019 6:51 PM
---Advertisement---

आयसीसी वन-डे विश्वचषक 2019ला 30मेपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी प्रत्येक संघाला दोन सराव सामने खेळावे लागणार आहे. या सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे.

हे सराव सामने 24 ते 28 मे, 2019च्या दरम्यान खेळले जाणार आहेत. हे सामने ब्रिस्टल काऊंटी ग्राउंड, कार्डिफ वेल्स स्टेडियम, हॅम्पशायर बाऊल आणि ओव्हल येथे होणार आहेत.

या सामन्यांची तिकिटे आणि प्रसारणाची माहिती एप्रिलमध्ये सांगितली जाणार आहे.

यामध्ये भारताचा पहिला सराव सामना 25 मे, 2019ला न्यूझीलंड विरुद्ध ओव्हल मैदानावर होणार आहे. तर दुसरा सामना 28 मे, 2019ला बांगलादेश विरुद्ध कार्डिफ वेल्स स्टेडियमवर होणार आहे.

या सराव सामन्यांमध्ये 15 जणांच्या संघातील कोणतेही खेळाडू खेळू शकणार आहेत. त्यामुळे  या सामन्यांना आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटचा दर्जा मिळणार नाही. हे सराव सामने 50-50 षटकांचे होणार आहेत.

विश्वचषकात प्रथमच सर्व संघ एकमेंकाविरुद्ध साखळी फेरीचे सामने खेळणार आहेत. त्यामध्ये भारताचा पहिला सामना 5 जूनला भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. त्याचबरोबर या विश्वचषकाचा अंतिम सामना 14 जुलैला लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे.

आयसीसी विश्वचषक 2019चे भारताचे सामने-

25 मे, 2019 – भारत विरुद्ध न्यूझीलंड (पहिला सराव सामना)

28 मे, 2019 – भारत विरुद्ध बांगलादेश (दुसरा सराव सामना)

5 जून, 2019 –  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

9 जून, 2019 – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

13 जून, 2019 – भारत विरुद्ध न्यूझीलंड

16 जून, 2019 – भारत विरुद्ध पाकिस्तान

22 जून, 2019 – भारत विरुद्ध अफगाणिस्तान

27 जून, 2019 – भारत विरुद्ध विंडीज

30 जून, 2019 – भारत विरुद्ध इंग्लंड

2 जुलै, 2019 – भारत विरुद्ध बांगलादेश

6 जुलै, 2019 – भारत विरुद्ध श्रीलंका

उपांत्य फेरी – 

पहिला उपांत्य सामना – 9 जुलै

दुसरा उपांत्य सामना – 11 जुलै

अंतिम सामना- 14 जुलै

महत्त्वाच्या बातम्या-

ठरले! २०२३च्या विश्वचषकाचे यजमानपद असणार या देशाकडे…

तिसऱ्या वनडेत मिताली राजने रचला इतिहास, असा कारनामा करणारी बनली पहिलीच महिला क्रिकेटपटू

ISL 2018-19: गोव्याविरुद्ध भरपाईचा प्रेरीत मुंबईचा निर्धार

प्रो कबड्डीसाठी युवा खेळाडूंची निवड चाचणी ५ फेब्रुवारी पासून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment