क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या तिकिटांविषयी माहिती दिली आहे. बीसीसीआयने सांगितले आहे की, क्रिकेटप्रेमी ‘बुकमायशो’द्वारे ऑनलाईन तिकीटे बुक करू शकतील. याव्यतिरिक्त असेही सांगितले की, आगामी विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी चाहते 24 ऑगस्टपासून तिकीटे खरेदी करू शकतील. ऑनलाईन तिकीटे खरेदी करण्यासाठी सायंकाळी 6 वाजता उपलब्ध असतील. विश्वचषक सामन्यांव्यतिरिक्त त्यापूर्वी होणाऱ्या सराव सामन्यांची तिकीटेही चाहत्यांना खरेदी करता येणार आहेत.
ऑनलाईन तिकीटे कशी करायची बुक?
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेतील भारतीय सामन्यांची तिकीटे 29 ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहेत. क्रिकेट चाहत्यांना 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ऑनलाईन तिकीटे बुक करता येतील. तसेच, उपांत्य आणि अंतिम सामन्यांची तिकीटे 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता उपलब्ध असतील. अशाप्रकारे, क्रिकेटप्रेमी विश्वचषकाची तिकीटे ऑनलाईन बुक करू शकतात.
🚨 NEWS 🚨 BCCI announces BookMyShow as Ticketing Platform for ICC Men’s Cricket World Cup 2023. #CWC23
More Details 🔽 https://t.co/HKgat0A5bB
— BCCI (@BCCI) August 23, 2023
स्पर्धेतील सामने
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळला जाईल. विश्वचषक 2023मध्ये एकूण 58 सामने खेळले जातील. यापूर्वी 10 सराव सामने खेळले जातील. भारताच्या 12 वेगवेगळ्या मैदानांनावर विश्वचषकाचे सामने खेळले जातील. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने विश्वचषकातील अभियानाची सुरुवात करेल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळला जाईल. तसेच, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील सामना 14 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. भारत-पाकिस्तान (India-Pakistan) संघातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.
राऊंड रॉबिन प्रकारात खेळला जाणार विश्वच
या विश्वचषकातील सर्व संघ इतर 9 संघांसोबत राऊंड रॉबिन प्रकारात खेळतील. यापैकी गुणतालिकेतील अव्वल 4 स्थानांवरील संघ उपांत्य सामन्यात जागा मिळवतील. तसेच, जिंकणारे संघ अंतिम सामन्यात एकमेकांना भिडतील. मागील वेळी इंग्लंडमध्येही याच प्रकारात विश्वचषषक खेळला गेला होता. त्यावेळी इंग्लंडने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला होता. विशेष म्हणजे, आता या विश्वचषकाची सुरुवात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामन्याने 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. (icc cricket world cup 2023 online tickets bcci confirms date and how to book know here)
हेही वाचा-
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत बुमराहने घडवला इतिहास, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा फक्त 5वा भारतीय कर्णधार
दमदार कमबॅक, प्रदर्शनही झक्कास! मालिकावीर बनताच बूम बूम बुमराह म्हणाला, ‘सतत वाट पाहणे कंटाळवाणे…’