बहुप्रतिक्षित वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा अवघ्या 9 दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेकडे सर्व क्रिकेटरसिकांचे लक्ष लागले आहे. मात्र, त्यापूर्वी विश्वचषक स्पर्धेच्या ट्रॉफीने जगभराचा प्रवास केला आणि आता ट्रॉफी भारताच्या वेगवेगळ्या भागातून प्रवास करत आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना त्याची झलक बघायला मिळाली. आता मंगळवारी (दि. 26 सप्टेंबर) पुणेकरांना ही ट्रॉफी पाहण्याची संधी मिळणार आहे.
ट्रॉफीचा प्रवास कुठून कुठपर्यंत?
महत्त्वाची बाब अशी की, पुणेकरांना विश्वचषक ट्रॉफी (World Cup Trophy) पाहता यावी, यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने भव्य रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीचे मंगळवारी आयोजन करण्यात आले आहे. सेनापती बापट मार्गावरील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलपासून दु. 1 वाजता या रॅलीची सुरुवात होईल. तसेच, सेनापती बापट रस्त्याने कृषी महाविद्यालयात रॅलीची सांगता होईल. क्रिकेट चाहत्यांना विश्वचषक ट्रॉफीची झलक पाहायला मिळावी, यासाठी रॅली सिम्बायोसिस महाविद्यालय, बीएमसीसी आणि फर्ग्युसन महाविद्यालय येथे काही काळ थांबविण्यात येणार आहे.
सजवलेल्या बसमधून निघणार भव्य रॅली
एमसीए अध्यक्ष रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर (एक्स) अकाऊंटवर रॅलीविषयी माहिती दिली. यात त्यांनी ट्रॉफीची रॅलीसाठी सजवलेल्या बसविषयीही सांगितले. त्यांनी लिहिले की, “याच सजवलेल्या गाडीतून आयसीसी विश्वचषक 2023च्या ट्रॉफीची उद्या (मंगळवार) प्रथमच पुण्यात भव्य मिरवणूक निघणार आहे. पुन्हा 25 वर्षांनीच ही ट्रॉफी भारतात येईल. त्यामुळं ट्रॉफी पाहण्याची दुर्मिळ संधी गमावू नका आणि या मिरवणुकीत सहभागी व्हायलाही विसरू नका.”
याच सजवलेल्या गाडीतून #ICC_World_Cup_2023 च्या #ट्रॉफी ची उद्या (मंगळवार) प्रथमच पुण्यात भव्य मिरवणूक निघणार आहे. पुन्हा 25 वर्षांनीच ही #ट्रॉफी भारतात येईल..
त्यामुळं ट्रॉफी पाहण्याची दुर्मिळ संधी गमावू नका आणि या मिरवणुकीत सहभागी व्हायलाही विसरू नका…
वेळ – दुपारी 1 वाजता.… pic.twitter.com/pX1cbuffHY
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 25, 2023
किती तास चालणार रॅली?
विश्वचषक ट्रॉफीची रॅली तब्बल तीन तास चालणार आहे. या रॅलीमध्ये महाराष्ट्राचे आजी माजी खेळाडू, रणजीपटू आणि संघटनेचे अन्य भागधारक सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त विविध सायकलिंग क्लब, मोटर सायकल रायडर्स गट आणि मॅरेथॉन धावकांना रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी आधीच केले आहे. (ICC Cricket World Cup Trophy Tour to be held in Pune with special Bus accorded for the event know here time and route)
महत्त्वाच्या बातम्या-
बोंबला! पोलिसांनी कापलं बाबर आझमचं चलन, ठोठावला दंड; पाकिस्तानी कर्णधाराने काय चूक केली वाचाच
‘मग त्यांच्याशी भांडावे का?’, भारताविरुद्ध आक्रमकता न दाखवण्याच्या प्रश्नावर PAK गोलंदाजाचे लक्षवेधी उत्तर