आयसीसीने नुकत्याच संपलेल्या महिलांच्या न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडच्या टी२० मालिकेनंतर सुधारित टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. यातील फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने एका स्थानाची प्रगती करत तिसरे स्थान गाठले असून भारताची युवा सलामीवीर शेफाली वर्मा देखील एका स्थानाने प्रगती करत दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे.
याचवेळी गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडच्या सारा ग्लेनने अव्वल तीन मध्ये मुसंडी मारली असून इंग्लंडच्याच कॅथरीन ब्रंटने दोन स्थानांनी सुधारणा करून दहावे स्थान गाठले आहे. भारताच्या दृष्टीने दीप्ती शर्माने आपले सहावे स्थान कायम राखले आहे. मात्र राधा यादव आणि पूनम यादवची घसरण झाली आहे.
सुझी बेट्सच्या घसरणीने शेफाली वर्माला फायदा
भारताचा महिला क्रिकेट संघ कोरोना विषाणूपश्चात एकही सामना खेळला नव्हता. परवापासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु झालेल्या वनडे मालिकेद्वारे त्यांचे मैदानावर पुनरागमन झाले. मात्र शेफाली वर्मा वनडे संघाचा भाग नसल्याने ती वनडे मालिका संपल्यावर थेट टी२० मालिकेत भाग घेईल. परंतु तरीही तिच्या टी२० क्रमवारीत सुधारणा झाली आहे.
याला न्यूझीलंडच्या सुझी बेट्सची झालेली घसरण कारणीभूत ठरली आहे. सुझी बेट्स दुसऱ्या क्रमांकावरून थेट सहाव्या क्रमांकावर आल्याने शेफाली वर्मासह सोफी डिव्हाईन, मेग लॅनिंग आणि अॅलिसा हिली या सगळ्यांनीच एकेका स्थानाने प्रगती केली आहे. तर अव्वल क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने आपले स्थान कायम राखले आहे. भारताच्या स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी अनुक्रमे सातवे आणि नववे स्थान कायम राखले आहे.
New Zealand skipper Sophie Devine moves up one spot to No.3 in the weekly @MRFWorldwide ICC Women's T20I Rankings update for batting after the #NZvENG series.
Full list: https://t.co/3ONAIO7dVQ pic.twitter.com/n3hlIjBuOU
— ICC (@ICC) March 9, 2021
गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचे वर्चस्व
टी२० गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडची सोफी ईक्लेस्टोन अव्वल स्थानी कायम असून दक्षिण आफ्रिकेच्या शबनिम इस्माईलने देखील दुसरे स्थान कायम राखले आहे. सारा ग्लेनने तिसरे स्थान गाठल्याने ऑस्ट्रेलियाच्या मेगन शूटची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. भारताची दीप्ती शर्मा सहाव्या स्थानी कायम आहे. मात्र राधा यादव आणि पूनम यादव यांची प्रत्येकी एका स्थानाने घसरण झाल्याने त्या आता अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत.
🔥 Sarah Glenn storms into top three
🙌 Katherine Brunt moves up to No.10England bowlers make significant gains in the latest @MRFWorldwide ICC Women's T20I Rankings update.
Full list: https://t.co/3ONAIO7dVQ pic.twitter.com/FxRA8MtArF
— ICC (@ICC) March 9, 2021
महत्वाच्या बातम्या:
अबब! वनडेत २३१ च्या फलंदाजी सरासरीने कुटल्या धावा, ही खेळाडू यंदा ठरली प्लेअर ऑफ द मंथ
मोठी बातमी! प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार यंदा या क्रिकेटरच्या पारड्यात
रिषभ पंत एकटाच विरोधी संघाला पुरून उरेल, तो एक मॅचविनर खेळाडू आहे