---Advertisement---

बुमराहचे करीयर संपले का? आयसीसीच्या डॉक्टरांनी दिले असे उत्तर

---Advertisement---

भारतीय संघाला आगामी टी20 विश्वचषकापूर्वी अजून एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहा दुखापतीमुळे टी20 विश्वचषकात खेळणार असल्याची माहिती समोर येतेय. बुमराह मागच्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत त्याने संघात पुनरागमन केले, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी माघार देखील घेतली. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) डॉक्टरांनी बुमराहच्या कारकिर्दीविषयी मोठे वक्तव्य केले आहे.

आयसीसीच्या मेडिकल टीमचे सदस्य असलेल्या डॉ. दिनशॉ पारडीवाला यांना बुमराहच्या दुखापतीविषयी विचारले असता ते म्हणाले,

“स्ट्रेच फ्रॅक्चर म्हणजे कारकिर्दीला धोका किंवा कारकिर्दीचा शेवट नाही. बर्‍याच प्रकरणांमध्ये तुम्ही विश्रांती घेतल्यावर आणि रीहॅब पूर्णपणे सामान्य स्थितीत परत येऊ शकता. स्ट्रेस फ्रॅक्चर बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो. त्याची प्रक्रिया मंद आहे. आपण वाट पाहण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. स्ट्रेच फ्रॅक्चरसाठी विश्रांती हा एक महत्त्वाचा उपचार आहे. प्रक्रियेतून गेल्यानंतर तुम्ही पुर्वरुप प्राप्त करू शकता.”

पारडीवाला हे देशातील अव्वल खेळाडू असलेल्या नीरज चोप्रा, सायना नेहवाल व रवींद्र जडेजा यांना देखील मार्गदर्शन करत असतात. मागील दोन वर्षापासून ते आयसीसीच्या मेडिकल टीमचे सदस्य आहेत.

जसप्रीत बुमराह जुलै महिन्यातील इंग्लंड दौऱ्यानंतर कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळला नव्हता. तो पाठीच्या दुखापतीतून सावरत असल्याने संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती दिली होती. टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सहभागी करून घेण्यात आले. तो मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना खेळला. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरू होताच त्याचे दुखणे पुन्हा एकदा उफाळून आले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
T20 Word Cup 2022: स्पर्धेच्या काही दिवसांआधीच भारत ब्रिसबेनमध्ये ठोकणार तळ! जाणून घ्या कारण
ब्रेकिंग! जसप्रीत बुमराहच्याजागी भारताच्या टी20 संघात ‘या’ वेगवान गोलंदाजाची एंट्री 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---