क्रिकेट मैदानावर जेवढी महत्त्वाची भूमिका खेळाडूंची असते, तेवढीच महत्त्वाची भूमिका पंचाचीही असते. पंचाचा एक चुकिचा निर्णय संपूर्ण सामन्याचे चित्र बदलु शकतो. त्यामुळे आयसीसी पंचाची निवड करताना खूप दक्षता बाळगून करत असते. मात्र, खूप कमी जणांना हे माहिती आहे की, या पंचांना त्यांच्या कामासाठी किती पैसे मिळतात. त्यांची कसोटी, वनडे आणि टी२० सामन्यांची रक्कम वेगळी असते. त्याबरोबरच त्यांना लाखोंमध्ये वार्षिक पगार दिली जाते.
तर जाणून घेऊया, जगातील काही नामांकित आणि महागड्या पंचांविषयी ICC Elite Umpires And Their Salaries
अलिम दार
पाकिस्तानचे माजी खेळाडू अलिम दार हे क्रिकेट जगातील सर्वोत्कृष्ट पंच आहेत. दार हे विश्वचषक २००३, २००७ आणि २०११ अशा अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात पंच होते. एवढेच नाही तर, त्यांना २००९-१०मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट पंच (अंपायर ऑफ द ईयर) म्हणून निवडण्यात आले होते. काही वेबसाईटनुसार, दार यांना कसोटीसाठी २१०८७४ रुपये, टी२०साठी ७०२९१ रुपये आणि वनडेसाठी १५४६४१ रुपयांसारखी मोठी रक्कम दिली जाते. या सगळ्या व्यतिरिक्त त्यांची वार्षिक पगार ही ३१६३११७ रुपये इतकी असते.
पॉल रिफेल
ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू पॉल रिफेल यांनी २००४मध्ये पंच क्षेत्रात पदार्पण केले. रिफेल यांना टी२० सामन्यांसाठी आयसीसीकडून ७०२९१ रुपये मिळतात. तर, कसोटीसाठी २१०८७४ आणि वनडेसाठी १५४६४१ रुपये मिळतात. शिवाय त्यांची वार्षिक पगार ही ३१६३११७रुपये इतकी आहे.
क्रिस गफाने
क्रिकेट जगतातील शानदार पंचांपैकी एक असणाऱ्या क्रिस गफाने यांना आयसीसीच्या इलिट पॅनलमध्ये सामाविष्ट करण्यात आले आहे. गफाने यांना वनडेसाठी १५४६४१ रुपये, टी२०साठी ७०२९१ रुपये आणि कसोटीसाठी २१०८७४ रुपये दिले जातात. तसेच त्यांची वार्षिक पगार ही ३१६३११७ इतकी आहे.
नाइलेज लॉन्ग
नाइलेज लॉन्ग हेदेखील जगातील सर्वात महागड्या पंचापैकी एक आहेत. त्यांना आयसीसीकडून टी२०साठी ७०२९१ रुपये, वनडेसाठी १५४६४१ रुपये आणि कसोटीसाठी २१०८७४ रुपये दिले जातात. त्याबरोबरच त्यांची वार्षिक पगार ही ३१६३११७ रुपये इतकी आहे.
कुमार धर्मसेना
श्रीलंकाचे माजी क्रिकेटपटू कुमार धर्मसेना यांना कसोटीसाठी २१०८७४ रुपये, वनडेसाठी १५४६४१ रुपये आणि टी२०साठी ७०२९१ रुपये दिले जातात. तर त्यांना आयसीसीकडून वर्षभराचे २४६०००० रुपये मिळतात.
रिचर्ड केटलेबरो
२०११मध्ये रिचर्ड केटलेबरो यांना आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये सामाविष्ट करण्यात आले होते. त्यांना कसोटीसाठी २१०८७४ रुपये, वनडेसाठी १५४६४१ रुपये आणि टी२०साठी ७०२९१ रुपये दिले जातात. तर, त्यांची वार्षिक पगार ही २४६०००० रुपये इतकी आहे.
ब्रूस ऑक्सनफोर्ड
ब्रूस ऑक्सनफोर्ड यांनी २००१मध्ये त्यांच्या पंच कारकिर्दीची सुरवात केली होती. त्यांना आयसीसीकडून टी२० सामन्यासाठी ७०२९१ रुपये, वनडेसाठी १५४६४१ रुपये आणि कसोटीसाठी २१०८७४ रुपये मिळतात. शिवाय त्यांची वार्षिक पगार ही २४६०००० रुपये इतकी आहे.
रॉड कटर
रॉड कटर यांना आयसीसीक़ून कसोटीसाठी २१०८७४ रुपये, टी२० सामन्यासाठी ७०२९१ रुपये आणि वनडेसाठी १५४६४१ रुपये मिळतात. याबरोबरच त्यांची वार्षिक पगार ही २४६०००० रुपये इतकी आहे.
मराइस इरास्मस
मराइस इरास्मस हे खूप शानदार पंच आहेत. त्यांना टी२० सामन्यासाठी ७०२९१ रुपये, वनडेसाठी १५४६४१ रुपये आणि कसोटीसाठी २१०८७४ रुपये मिळतात. शिवाय त्यांची वार्षिक पगार ही २४६०००० रुपये इतकी आहे.
रिचर्ड इलिंगवर्थ
आयसीसी रिचर्ड इलिंगवर्थ यांना कसोटीसाठी २१०८७४ रुपये, वनडेसाठी १५४६४१ रुपये आणि टी२०साठी ७०२९१ रुपये दिले जातात. तर, वर्षभराचे त्यांना २४६०००० रुपये मिळतात.
इयान गोल्ड
इंग्लंडचे माजी खेलाडू हे आयसीसीच्या एलिट पॅनलचा भाग आहेत. त्यांना टी२० सामन्यासाठी ७०२९१ रुपये, वनडेसाठी १५४६४१ रुपये आणि कसोटीसाठी २१०८७४ रुपयांसारखी मोठा रक्कम मिळते. तर, त्यांची वार्षिक पगार ही २४६०२०२ रुपये इतकी आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
कसोटीमध्ये द्विशतक झळकावणारे भारतीय खेळाडू; यातील एकाने केलाय ‘हा’ मोठ्ठा विक्रम