---Advertisement---

आयसीसीची मोठी घोषणा, वनडे-टी२० विश्वचषक संघाच्या संख्येत वाढ; चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल झाला ‘हा’ निर्णय

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज आयसीसी स्पर्धांविषयी मोठा निर्णय घेतला आहे. साल २०२४ पासून वनडे विश्वचषक आणि २०२७ पासून टी२० विश्वचषकातील सहभागी संघांची संख्या वाढवण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. वनडे विश्वचषकात एकूण १४ आणि टी२० विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी करण्याचे त्यांनी ठरवले आहे. याबरोबरच चॅम्पियन्स ट्रॉफीची पुन्हा नव्याने सुरुवात केली जाणार असल्याचेही समजत आहे.

साल २०२७ आणि २०३१ सालच्या विश्वचषकात प्रत्येकी एकूण ५४ सामने खेळल्या जातील. तर १४ संघांचा यात सहभाग असेल. ७-७ संघांचे दोन गट करून ही स्पर्धा खेळवण्यात येईल. त्याचवेळी २०२४, २०२६, २०२८ आणि २०३० सालच्या टी२० विश्वचषकात तब्बल २० संघ खेळतील आणि एकूण ५५ सामने यात खेळवले जातील. आठ संघांचा सहभाग असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे २०२५ आणि २०२९ साली आयोजन करण्यात येईल. तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरी २०२५ , २०२७, २०२९ आणि २०३१ साली खेळवल्या जातील.

सुपर सिक्स फेरीचे पुनरागमन

या सर्व बदलांमुळे वनडे विश्वचषकामध्ये ‘सुपर सिक्स फेरी’चेही पुनरागमन झाले आहे. यानुसार विश्वचषकाच्या सुरुवातीला १४ संघांची दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल. प्रत्येक संघ ६ साखळी फेरी सामने खेळेल. दोन्ही गटांमधील अव्वल तीन-तीन संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील. सुपर सिक्स फेरीत प्रत्येक संघ दुसऱ्या गटातील ३ संघांविरुद्ध सामने खेळेल. या फेरीच्या शेवटी अव्वल ४ संघ उपांत्य फेरी गाठतील. त्यानंतर अंतिम सामना होईल. यापुर्वी २००३ सालचा विश्वचषक सुपर सिक्स फेरी पद्धतीने झाला होता.

टी२० विश्वचषकात २० संघांची ५ गटांमध्ये विभागणी केली जाईल. या दोन्ही गटांतील अव्वल २ संघ सुपर एट फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचे स्वरुप पुर्वीप्रमाणे असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

गेल, पोलार्डची फटकेबाजी अन् बोल्ट, जेमिसनचा भेदक मारा; ‘या’ संघांचे खेळाडू उर्वरित आयपीएलला मुकणार

सचिन तेंडुलकरला सर्वाधिक अडचणीत आणणारा गोलंदाज, विमान अपघातात झाला होता दुर्दैवी मृत्यू

डायट प्लॅन सांगताच कॅप्टन कोहली झाला ट्रोल, मग दिले ‘हे’ खमंग प्रत्युत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---