आयसीसीनं नुकतीच ताजी टी20 क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत अनेक भारतीय खेळाडूंना मोठा फायदा झाला आहे. गेल्या आठवड्यात संपलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत भारतीय फलंदाजानी जबरदस्त कामगिरी केली, यांचा त्यांना फायदा झाला आहे. टी20 क्रमवारीत यशस्वी जयस्वाल आणि शुमबन गिल यांनी मोठी झेप घेतली आहे.
टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अव्वल स्थानी कायम आहे. त्याचे 844 रेटिंग गुण आहेत. मात्र दुसऱ्या स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडच्या फिल सॉल्टनं सूर्याची बरोबरी केली. तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर पाकिस्तानचे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान आहेत.
टॉप 5 च्या बाहेर भारताच्या यशस्वी जयस्वालला 4 स्थानांचा फायदा झाला. तो आता 6व्या स्थानी पोहचला आहे. यशस्वीनं झिम्बाब्वाविरुद्धच्या मालिकेत खेळलेल्या 3 टी20 सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी केली होती, ज्याचा त्याला फायदा झाला. मात्र यामुळे इतर फलंदाजांना क्रमवारीत नुकसान झालं आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर, भारताचा ऋतुराज गायकवाड तर वेस्ट इंडिजचा ब्रँडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स यांना एक-एक स्थानाचं नुकसान होऊन ते क्रमश: 7व्या, 8व्या. 9व्या आणि 10व्या स्थानी घसरले आहेत.
कर्णधार म्हणून आपली पहिली मालिका खेळणाऱ्या शुबमन गिलला मोठा फायदा झालाय. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत त्याची कामगिरी चांगली राहिली. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या कामगिरीमुळे त्याला तब्बल 36 स्थानांचा फायदा झाला आहे. शुमबन टी20 क्रमवारीत आता 37व्या स्थानी पोहचला आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा आदिल रशीद अव्वल स्थानी कायम असून, टॉप 10 मध्ये अक्षर पटेल (9) हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भविष्यात कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर त्याची जागा कोण घेणार? ‘या’ खेळाडूंमध्ये आहे धमक
10 षटकात 250 धावा… दोघांनी ठोकली शतकं..!! अशी फलंदाजी स्वप्नातही पाहिली नसेल
अर्शदीप सिंगला ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पणाची संधी! फक्त करावं लागेल हे काम