---Advertisement---

२०२३ विश्वचषकासाठी आयसीसीने केली सुपर लीग टूर्नामेंट लाँच; भारताव्यतिरिक्त हे संघ करणार क्वालिफाय

On: मंगळवार, जुलै 28, 2020 6:52 PM
---Advertisement---

भारतात होणाऱ्या २०२३ वनडे विश्वचषकासाठी आयसीसीने सोमवारी (२७ जुलै) सुपर लीग क्वालिफायर स्पर्धा सुरू केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड संघात ३० जुलैपासून साऊथँम्पटन येथे ३ वनडे सामन्याच्या मालिकेची सुरुवात होणार आहे. सुपर लीगचे इतर वेळापत्रक नंतर जारी केले जाईल. यजमान भारताव्यतिरिक्त सुपर लीगमधील अव्वल ७ संघ थेट २०२३ विश्वचषकात पात्र ठरतील.

या विश्वचषक क्वालिफायर्समध्ये (पात्रताफेरी) नेदरलँड्सह आयसीसीचे १२ पूर्णवेळ सदस्य संघ भाग घेत आहेत. नेदरलँड्सने जागतिक क्रिकेट सुपर लीग २०१५-१७ विजय मिळवत सुपर लीगमध्ये स्थान मिळविले आहे.

सुपर लीग वनडे क्रिकेटला करेल प्रसिद्ध- आयसीसी

आयसीसी क्रिकेट ऑपरेशन्सचे सरव्यवस्थापक जेफ अलार्डिसने म्हटले की, “नवीन सुपर लीग पुढील ३ वर्षांमध्ये वनडे क्रिकेटला प्रसिद्ध करेल. कारण यामार्फत २०२३ वनडे विश्वचषकात कोणताही संघ स्थान मिळवेल. वनडे सुपर लीग चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी होईल. कारण सध्या लीग क्रिकेट चांगलेच लोकप्रिय होत आहे.”

कोरोनामुळे रद्द झालेल्या सामन्यांचे वेळापत्रक पुन्हा ठरविण्याची संधी मिळेल

अलार्डिस म्हणाले, २०२३ च्या शेवटी विश्वचषकाचे आयोजन करण्याच्या निर्णयामुळे आम्हाला कोविड-१९मुळे रद्द झालेल्या सामन्यांचे वेळापत्रक पुन्हा ठरविण्यास वेळ मिळेल. आणि आम्हाला क्वालिफिकेशन प्रक्रिया वाचवता येईल.

असा असेल सुपर लीगचा प्रकार

क्रिकेट सुपर लीगमध्ये भाग घेणारा प्रत्येक संघ २०२३पर्यंत ८ मालिका खेळणार आहे. यामध्ये ४ मालिका मायदेशात आणि ४ मालिका परदेशात होतील. प्रत्येक मालिकेत ३ सामने असतील. या मालिकेत विजय-पराभवाच्या आधारे रँकिंग मिळेल आणि याच आधारे संघ २०२३ आयसीसी विश्वचषकासाठी पात्र ठरतील.

जे ५ संघ थेट पात्र ठरणार नाहीत, त्यांना क्वालिफायरमध्ये आयसीसीच्या ५ सहसदस्य देशांबरोबर खेळावे लागेल. या क्वालिफायरमध्ये (पात्रता फेरी) खेळणारे अव्वल २ संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकात भाग घेतील.

जिंकल्यावर प्रत्येक संघाला मिळतील १० गुण

क्रिकेट सुपर लीगमध्ये प्रत्येक संघाला एक सामना जिंकल्यावर १० गुण मिळतील. सामना बरोबरीत सुटला किंवा कोणत्याही कारणाने रद्द झाला, तर ५ गुण दिले जातील. ८ मालिकेदरम्यान मिळालेल्या गुणांच्या आधारे संघांची रँकिंग ठरवली जाईल. त्याचबरोबर सारखे गुण असणाऱ्या संघांना वेगळे करण्यासाठीही नियम बनविले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-पाकिस्तानला एकेवेळी रडवणार क्रिकेटर झाला हिरो, करतोय तामिळ चित्रपटात पोलीसाचा रोल

-रैना- धोनीमध्ये कर्णधार विराट कोहली या खेळाडूला देणार नाही टीम इंडियात संधी

-पावसामुळे इंग्लंडचा विजय लांबणीवर; पहा शेवटच्या दिवशी काय आहे पावसाचा अंदाज

ट्रेंडिंग लेख-

-गेल्या १० वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे ५ अष्टपैलू खेळाडू….

-६ युवा खेळाडू जे यावर्षी २०२० आयपीएलमध्ये करू शकतात पदार्पण…

-रोहित-विराटला मागे टाकून आयपीएलमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणारे हे ५ फलंदाज…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---