T20 World Cupक्रिकेटटॉप बातम्या

आयसीसीच्या नियमामुळे झाला बांग्लादेशचा पराभव? पंचांच्या निर्णयानंतर गोंधळ

टी20 विश्वचषकाचा 21वा सामना दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अवघ्या 4 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.

या सामन्यानंतर आयसीसीच्या एका नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हा असा नियम आहे, ज्यामुळे बांग्लादेशला आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. वास्तविक, बांग्लादेशच्या 17व्या षटकात अंपायरनं एक चुकीचा निर्णय दिला, ज्यामुळे संघाला 4 धावांचं नुकसान सहन करावं लागलं. अखेर बांग्लादेशचा संघ 4 धावांच्या फरकानं सामना हरला.

या षटकाचा दुसरा चेंडू महमदुल्लाहच्या पॅडला लागला होता. अंपायरनं त्याला बाद दिलं, ज्यानंतर महमदुल्लाहनं रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यू पाहिल्यानंतर तिसऱ्या अंपायरनं त्याला नाबाद घोषित केलं. हा चेंडू पॅडला लागून सीमारेषेपर्यंत गेला होता. मात्र अंपायरनं बाद दिलं असल्यामुळे बांग्लादेशला 4 धावा मिळाल्या नाहीत. जरीही महमदुल्लाहला नंतर नाबाद घोषित करण्यात आलं, तरीही बांग्लादेशला लेग बायच्या 4 धावा मिळाल्या नाहीत.

आयसीसीचा नियम आहे की, जर अंपायरनं कोणत्याही फलंदाजाला पायचित बाद दिलं, तर तो चेंडू तेथेच ‘डेड’ होतो. यानंतर त्या चेंडूवर धावा मिळत नाहीत, तिसऱ्या अंपायरनं हा निर्णय फिरवला तरीही! बांग्लादेशला या नियमामुळेच 4 धावा मिळाल्या नाहीत आणि शेवटी त्यांचा 4 धावांनीच पराभव झाला.

भारताचा माजी खेळाडू वसीम जाफर यानं या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बांग्लादेशच्या चाहत्यांसाठी खूप वाईट वाटत आहे, असं ट्वीट त्यानं केलं. याशिवाय माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनीही या नियमावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी आयपीएल दरम्यानही हा नियम बदलण्याची मागणी केली होती.

 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूनं केलं लग्न! सोशल मीडियावर पार्टनरसोबतचे फोटो केले शेअर
टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेनं केला अद्भूत पराक्रम, टीम इंडियाचा विक्रम मोडून रचला इतिहास
“तुला लाज वाटली पाहिजे”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं शिख धर्माची खिल्ली उडवल्यानंतर हरभजन सिंग भडकला

Related Articles