---Advertisement---

T20 WC26 Final: टीम इंडियाच्या पडद्यामागचा खरा सूत्रधार! ज्याच्यामुळे भारताने जिंकल्या तीन आयसीसी स्पर्धा

On: सोमवार, मार्च 9, 2026 3:31 PM
Rohit Sharma Ajit Agarkar (1)
---Advertisement---

भारत रविवारी (८ मार्च) तिसऱ्यांदा आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकाचा मानकरी ठरला. २०२६च्या आवृत्तीमधील अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. सामनावीर जसप्रीत बुमराह ठरला तर मालिकावीर पुरस्कार संजू सॅमसनने जिंकला. भारताला पुन्हा एकदा विजेतेपद जिंकून देण्यामागे आणखी एका दिग्गजाचा हात आहे. तो कोणी प्रशिक्षक, खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ नाही, मात्र त्याच्या निर्णयांमुळे भारताने एक नाही दोन नाही तर तीन आयसीसी विजेतेपद जिंकले आहेत.

भारतीय संघाचा मुख्य निवड अधिकारी अजित आगरकर यांनी घेतलेल्या अनेक निर्णायांमुळे सोशल मीडियावर खूप चर्चा झाल्या होत्या. तरीही त्यांनी हार न मानता संघासाठी महत्वाचे निर्णय घेत भारताला पुन्हा एकदा विजेतेपद जिंकण्यास मदत केली आहे.

आगरकर यांचा मुख्य संघनिवड अधिकारी म्हणून कार्यकाळ ४ जुलै, २०२३पासून सुरू झाला. त्यामध्ये त्यांनी अनेक चकित करणारे निर्णय घेतले. त्यामुळे भारताच्या मर्यादित षटकांच्या कामगिरीत जबरदस्त बदल पाहायला मिळाला. त्यांच्या कार्यकाळात भारताने तीन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत.
अजित आगरकर यांनी घेतलेले काही निर्णय-

आगरकर यांनीच सूर्यकुमार यादवला भारताच्या टी२० संघाचा कर्णधार म्हणून नेमले. तेव्हा सूर्यकुमारला नाही तर हार्दिक पांड्याला कर्णधार बनवावे असे चर्चा सुरू झाल्या, मात्र आगरकरांनी त्यांच्या निर्णयावर ठाम राहत सूर्यकुमारवर विश्वास दाखवला आणि भारत विश्वविजेता बनला.

रोहित शर्माला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचाही निर्णय आगरकर यांचाच होता. रोहितने भारताच्या विजेत्या २०२५ चॅम्पियन ट्रॉफीचे नेतृत्व केले होते. त्यानंतर लगेचच त्याच्याजागी शुबमन गिलला नेतृत्व सोपवले गेले.
तसेच टी२०मध्ये गिलची कामगिरी खालावल्याने त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णयही आगरकरांचा होता.

टी२० विश्वचषक २०२६चा सर्वात मोठा धक्कादायक निर्णय जो भारताच्या विजयाचे कारण बनला, ईशान किशन. आगरकरांनी ईशानला संधी दिली आणि त्याने विश्वचषकात कमालीची कामगिरी केली.

आगरकर यांच्याच कार्यकाळात भारत २०२३च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला. तेथे मात्र भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानेही आगरकरला भारताच्या टी२० विश्वचषक विजयाचे श्रेय दिले आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---