---Advertisement---

T20 WC26: महत्वाचे! भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी आयसीसीची मोठी घोषणा, ‘या’ दिग्गजांवर सोपवली जबाबदारी

On: शुक्रवार, जानेवारी 30, 2026 7:01 PM
---Advertisement---

आगामी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा कधी एकदाचा सुरू होतो असे चाहत्यांना वाटत आहे. सर्व या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातील पहिला सामना ७ फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. तसेच या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने ते साखळी सामन्यासाठी एकमेंकासमोर येणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील हाय-वोल्टेज समजला जाणारा हा सामना १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना) दोन नावे निश्चित केली आहेत.

आयसीसीने गटातील सामन्यासांठी पंचांची निवड केली आहे. त्यामध्ये २४ ऑन-फिल्ड अंपायर असून ६ मॅच रेफरी म्हणून समाविष्ट केले आहे. सुपर ८ आणि बाद फेरीसाठी नंतर पंच निवडले जातील. यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठीही अनुभवी पंचांची निवड करण्यात आली आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी पंच म्हणूून श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ यांची नावे आयसीसीने जाहीर केली आहेत. तसेच ७ फेब्रुवारीला होणाऱ्या भारताच्या अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पॉल रायफेल आणि रॉड टकर यांना ऑन-फिल्ड अंपायर म्हणून नेमले आहे.

धर्मसेना यांनी अनेक मोठ्या सामन्यात पंच म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी २०१६ आणि २०२२च्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यातही पंच म्हणून काम पाहिले आहे. तसेच ते या २०२६च्या पहिल्या सामन्यातही असणार आहेत. इलिंगवर्थ यांनाही आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. त्याचबरोबर नितिन मेनन आणि सॅम नोगजस्की यांना स्कॉटलंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यासाठी पंच म्हणून नियुक्त केले आहे.

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधील सामना अधिकारी
मॅच रेफरी-
डीन कॉस्कर, डेव्हिड गिल्बर्ट, रंजन मदुगल्ले, अँड्र्यू पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन, जवागल श्रीनाथ.

अपांयर्स– रोलँड ब्लॅक, ख्रिस ब्राउन, कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, वेन नाइट्स, डोनोव्हान कोच, जयरामन मदनगोपाल, नितीन मेनन, सॅम नोगजस्की, के.एन.ए. पद्मनाभन, अल्लाहुद्दीन पालेकर, एहसान रझा, लेस्ली रायफर, पॉल रायफेल, लँग्टन रुसेरे, शरफुद्दौला इब्ने शाहिद, गाझी सोहेल, रॉड टकर, ॲलेक्स व्हार्फ, रवींद्र विमलसिरी, आसिफ याकूब.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---