---Advertisement---

T20 WC26: टिम सीफर्ट-फिन ऍलनची रेकॉर्डतोड पार्टनरशीप, किवींनी 15.2 षटकातच संपवला सामना

On: बुधवार, फेब्रुवारी 11, 2026 9:19 AM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये मंगळवारी (१० फेब्रुवारी) एक मोठा विश्वविक्रम झाला. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर प्रेक्षकांना चौकार-षटकारांची बरसात पाहायला मिळाली. या स्पर्धेतील ११वा सामना न्यूझीलंड वि. युएईचा असा झाला. यामध्ये न्यूझीलंडने १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. त्याचबरोबर त्यांनी एक वर्ल्डरेकॉर्डही केला.

या सामन्यात युएईचा कर्णधार मोहम्मद वसीमने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला सुरूवात झाली असता युएईने पहिलीच विकेट १२ धावसंख्येवर गमावली. त्यानंतर आलिशान शराफू आणि वसीमने दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. यामध्ये न्यूझीलंडच्या ७ खेळाडूंनी गोलंदाजी केली. शराफू ५५ धावा करत बाद झाला तर वसीम ६६ धावांवर नाबाद राहिला. या दोघांची जोडी मिचेल सॅंटनरने तोडली. मग युएईने २० षटकात ६ विकेट्स गमावत १७३ धावा केल्या. यामध्ये मॅट हेन्रीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. जेकब डफी, ग्लेन फिलिप्स, लोकी फर्ग्युसन आणि सॅंटनरने प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या.

फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडच्या फिन ऍलन आणि टिम सीफर्टने सुरूवात संयमी करताना दुसऱ्याच षटकापासून मोठे शॉट्स खेळले. त्यांनी पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ७८ धावा केल्या. त्यानंतर मात्र त्या दोघांना रोकण्यास युएईच्या गोलंदाजांना अपयश आले. विकेटकीपर-फलंदाज सीफर्ट ८९ धावा आणि ऍलन ८४ धावा करत नाबाद राहिले. न्यूझीलंडने १५.२ षटकातच लक्ष्य पूर्ण केले आणि मोठा विजय मिळवल्याने त्यांना नेट रनरेटमध्ये फायदा झाला. तसेच सीफर्टला ‘प्लेयर ऑफ दी मॅच’चा पुरस्कार मिळाला.

ऍलन-सीफर्टची ही भागीदारी पुरूष टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. त्यांनी या सामन्यात नाबाद १७५ धावांची भागीदारी केली. याआधी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम इंग्लंडच्या जोस बटलर आणि ऍलेक्स हेल्स यांच्या नावावर होता. त्यांनी २०२२मध्ये भारताविरुद्ध ऍडलेडमध्ये नाबाद १७० धावांची भागीदारी केली होती. तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचे क्विंटन डी कॉक आणि रिली रोसोव आहेत. त्यांनी त्याच विश्वचषकात सिडनीमध्ये बांग्लादेशविरुद्ध १६८ धावांची भागीदारी केली होती.

न्यूझीलंडचा हा या विश्वचषकातील सलग दुसरा विजय ठरला. यामुळे ते ग्रुप डी च्या अंकतालिकेत ४ गुणांसह पहिल्या स्थानावर आले आहेत. युएईचा हा पहिलाच सामना होता.

पुरुषांच्या टी20 विश्वचषकात सर्वाधिक भागीदारी (कोणत्याही विकेटसाठी)
१७५* ​​- टिम सीफर्ट-फिन ऍलन (न्यूझीलंड) वि. युएई, चेन्नई, २०२६
१७०* – जोस बटलर-ऍलेक्स हेल्स (इंग्लंड) वि. भारत, ऍडलेड, २०२२
१६८ – क्विंटन डी कॉक-रिली रोसोव (द. आफ्रिका) वि. बांगलादेश, सिडनी, २०२२
१६६ – महेला जयवर्धने-कुमार संगकारा (श्रीलंका) वि. वेस्ट इंडिज, बार्बाडोस, २०१०
१५४ – इब्राहिम झाद्रान- रहमानउल्लाह गुरबाज (अफगाणिस्तान) वि. युगांडा, प्रोव्हिडन्स, २०२४

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---