आयसीसी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेला विजेता मिळाला. रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने पाकिस्तानची दाणादाण उडवत विजय साकारला. तसेच, दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले. या विजयात गोलंदाज आणि फलंदाजांनी मोलाचा वाटा उचलला. गोलंदाजीत सॅम करन चमकला, तर फलंदाजीत बेन स्टोक्स याने अर्धशतक झळकावत सिंहाचा वाटा उचलला. इंग्लंडने या स्पर्धेची ट्रॉफी उंचावली असली, तरी यापूर्वीचे टी20 विश्वचषक विजेते संघ कोणते? असा प्रश्नही क्रिकेट चाहत्यांना पडला असेल, चला तर मग पाहूया विजेत्या संघांची यादी.
सामन्याचा आढावा
या अंतिम सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य ठरवत बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वातील पाकिस्तानला 20 षटकात 8 विकेट्स गमावत 137 धावांवर रोखले. पाकिस्तानच्या 138 धावांचे आव्हान इंग्लंडने 19 षटकातच पूर्ण केले आणि टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेची ट्रॉफी उंचावली.
A Ben Stokes special at the MCG! 😍
England take a special title home 🏆#PAKvENG | #T20WorldCupFinal | 📝 https://t.co/HdpneOrKoo pic.twitter.com/BOIrCSwlyn
— ICC (@ICC) November 13, 2022
आयसीसी टी20 विश्वचषक विजेते संघ
इंग्लंडने टी20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी त्यांनी 2010मध्ये हे विजेतेपद जिंकले होते. या टी20 विश्वचषकाची पहिली वहिली ट्रॉफी जिंकण्याचा मान भारतीय संघाला मिळाला होता. भारताने 2007मध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत ही ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. त्यानंतर 2009 सालचा टी20 विश्वचषक पाकिस्तानने जिंकला होता. 2010च्या टी20 विश्वचषकावर इंग्लंड संघाने आपले नाव कोरले होते. पुढे 2012चा टी20 विश्वचषक जिंकण्याची कामगिरी वेस्ट इंडिज संघाने केली होती. 2014च्या टी20 विश्वचषकाचा विजेते श्रीलंका संघ होता. तसेच, 2016 सालच्या टी20 विश्वचषकाचा विजेता पुन्हा वेस्ट इंडिज संघ ठरला होता. यानंतर मागील वर्षी म्हणजेच 2021च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने बाजी मारत ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. यानंतर आता पुन्हा इंग्लंडने ही ट्रॉफी जिंकली.
आयसीसी टी२० विश्वचषक विजेते
2007- भारत
2009- पाकिस्तान
2010- इंग्लंड
2012- वेस्ट इंडिज
2014- श्रीलंका
2016- वेस्ट इंडिज
2021- ऑस्ट्रेलिया
2022- इंग्लंड*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवे जगज्जेते! पाकिस्तानला नमवत इंग्लंडच्या शिरावर टी20 विश्वविजयाचा ताज; स्टोक्स पुन्हा हिरो
टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी दंडावर का बांधली काळी पट्टी? ‘हे’ आहे कारण