क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवणारे क्रिकेट बोर्ड आयसीसीने एक संघ जाहीर केला आहे. हा कसोटी संघ आहे. आयसीसीने 2022 कॅलेंडर वर्षात बॅट, चेंडू किंवा अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या पुरुष खेळाडूंचा कसोटी संघ निवडला आहे. खरं तर, 2022 आयसीसी पुरुष कसोटी संघ चकित करणारा आहे. कारण, यामध्ये भारताच्या फक्त एकाच खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आहे.
आयसीसीने निवडला 2022 पुरुष क्रिकेट संघ
आयसीसीने सन 2022मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये आयसीसीने सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा आणि वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेट यांची निवड केली आहे. तसेच, मधल्या फळीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन मार्नस लॅब्यूशेन, चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानी खेळाडू बाबर आझम, पाचव्या स्थानी इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो आणि सहाव्या स्थानी बेन स्टोक्स याला निवडले आहे. विशेष म्हणजे, या संघाचे कर्णधारपदही स्टोक्सच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे.
The ICC Men's Test Team of the Year 2022 is out 👀
Find out which players make the XI 📝 #ICCAwards
— ICC (@ICC) January 24, 2023
याव्यतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याला निवडले आहे. याव्यतिरिक्त चार गोलंदाजांनाही निवडले आहे. त्यात 3 वेगवान, तर 1 फिरकीपटूचा समावेश आहे. 3 गोलंदाजांमध्ये पॅट कमिन्स, कागिसो रबाडा आणि जेम्स अँडरसन यांचा समावेश आहे. तसेच, फिरकीपटू म्हणून नेथन लायन याला सामील करण्यात आले आहे.
रिषभ पंतची 2022मधील कामगिरी
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या 2022 कॅलेंडर वर्षातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 12 डाव खेळताना 61.81च्या सरासरीने 680 धावा चोपल्या आहेत. त्याने 90.90च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, या धावा करताना 2 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने यादरम्यान 21 षटकारांचाही पाऊस पाडला आहे. याव्यतिरिक्त त्याने यष्टीमागे 23 झेलही घेतले आहेत. या कामगिरीमुळे आयसीसीने पंतला 2022मधील सर्वोत्तम पुरुष कसोटी संघात स्थान दिले. (ICC Men’s Test Team of the Year 2022 revealed see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्म्रीती मंधाना ऑन फायर! विंडीजविरुद्ध झंझावाती फिफ्टी ठोकत रचला विक्रम, बनली जगातली तिसरी ओपनर
तिसऱ्या वनडेसाठी मैदानात उतरताच रोहित-विराटचा खास विक्रम, अझरुद्दीन अन् गांगुलीलाही पछाडले