आयसीसी वनडे विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाणार आहे. 2011 नंतर भारत प्रथमच वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवेल. मात्र, आयसीसीने अद्याप विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी मंगळवारी (27 जून) विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करू शकते.
या विश्वचषकाचे यजमान असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेळापत्रकाचा ड्राफ्ट काही दिवस अगोदर आयसीसीकडे पाठवला आहे. या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या देशांनाही वेळापत्रकाचा ड्राफ्ट पाठवण्यात आलेला. त्यानुसार ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर, अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळवला जाईल. या वेळापत्रकाला अद्याप आयसीसीची मान्यता मिळालेली नाही. आयसीसी मंगळवारी आवश्यक बदलांसह हे वेळापत्रक जाहीर करू शकते.
बीसीसीआयने तयार केलेल्या ड्राफ्टवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्षेप घेतला होता. पीसीबीने आपल्या तीन सामन्यांचे स्थळ बदलण्याची सूचना केली होती. यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा होणारा अहमदाबाद येथील सामना चेन्नई किंवा कोलकाता येथे खेळवण्याची त्यांची मागणी आहे. तर, चेन्नई येथे होणारा अफगाणिस्तान विरुद्धचा सामना बेंगलोर येथे तर, बेंगलोर येथे होणारा खेळण्याचे त्यांची इच्छा आहे. मात्र, बीसीसीआयने या निर्णयाला विरोध केलेला.
भारत प्रथमच स्वतः या संपूर्ण विश्वचषकाचे आयोजन करेल. भारतातील विविध अकरा शहरांमध्ये हे सामने होणार आहेत. उद्घाटनाचा सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड असा होऊ शकतो. उपांत्य फेरीचे सामने अनुक्रमे कोलकाता व मुंबई येथे होण्याची शक्यता आहे. तर, अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.
(ICC Might Announced ODI World Cup Schedule Today)
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ‘या’ 12 शहरात खेळले जाणार वनडे विश्वचषक 2023चे सर्व सामने, एका क्लिकवर घ्या जाणून
केविन-युवराजमधील भांडणानंतर इंग्लंडच्या दिग्गजाने मारला होता अल्टी-पल्टी शॉट, वाचा तो रोमांचक किस्सा