---Advertisement---

वनडे क्रमवारीत भारतीयांचा बोलबाला, भूवीची ९ स्थानांनी उडी; तर हार्दिक कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी विराजमान

---Advertisement---

नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने इंग्लंड संघाला २-१ ने धूळ चारली आहे. भारतीय संघाने मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना ७ धावांनी जिंकला होता. या मालिकेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाज यांनी चकमदार कामगिरी केली होती. याचे फळ त्यांना मिळाले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंना जबरदस्त फायदा झाला आहे.

भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध झालेल्या तीनही वनडे सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना ३०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. भारतीय संघातील फलंदाज चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते. बुधवारी (३१ मार्च) आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये विराट कोहली (८५७ गुण) पहिल्याच स्थानी कायम आहे. तर भारतीय संघाचा अनुभवी जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह (६९० गुण) या मालिकेतून बाहेर होता. याचा त्याला फटका बसला आहे. तो तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर गेला आहे.

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (८२५ गुण) तिसऱ्या स्थानी कायम आहे. तर केएल राहुल (६४६ गुण) याने लांब उडी घेत ३१ व्या स्थानावरून २७ वे स्थान गाठले आहे. यासोबतच रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांना देखील चांगलाच फायदा झाला आहे. हार्दिक पंड्या (५६१ गुण)ने दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात संघासाठी महत्वाची खेळी केली होती. यामुळे त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग मिळवली आहे. तो आयसीसीच्या फलंदाजांच्या यादीत ४२ स्थानी आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून आपल्या ‘ड्रीम फॉर्म’मध्ये असलेल्या रिषभ पंतला (४३२ गुण) देखील जबरदस्त फायदा झाला आहे. रिषभने टॉप १०० फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे.

तसेच भारतीय गोलंदाजांनी देखील या मालिकेत महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आयसीसीने जाहीर केलेल्या गोलंदाजांच्या यादीत त्यांना देखील चांगलाच फायदा झाला आहे. भुवनेश्वर कुमार (६३२ गुण) याने ९ स्थानांची झेप घेत ११ वे स्थान गाठले आहे. तर दुसरीकडे शार्दुल ठाकूर (४११ गुण) याने ९३ व्या स्थानावरून उडी घेत ८० वे स्थान गाठले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“फक्त आयपीएल नव्हे तर रिषभ टीम इंडियाचाही कर्णधार…,” भारताचे नेतृत्त्व करणाऱ्या माजी कॅप्टनचा दावा

SRHची चिंता वाढली; कोटींची किंमत मोजत खरेदी केलेल्या ‘या’ खेळाडूची आयपीएल २०२१ मधून माघार

आयपीएल २०२१: सामन्याचा नूर पालटू शकणारा प्रत्येक संघातील एक विदेशी खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---