---Advertisement---

आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय क्रिकेटपटूंचा दबदबा कायम

On: मंगळवार, डिसेंबर 24, 2019 4:31 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बाराबती स्टेडियमवर पार पडला . या सामन्यात भारतीय संघाने विंडीज संघाला 4 विकेटने मात देऊन मालिका 2-1 ने खिशात घातली.

या मालिकेनंतर आयसीसीने सोमवारी वनडे क्रमवारी जाहीर केली. आयसीसीच्या वनडे फलंदाजी क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या तर उपकर्णधार रोहित शर्मा दुसर्‍या क्रमांकावर कायम आहे.

वनडे क्रमवारीत रोहित शर्माने 10 गुण मिळवले आहे मात्र कोहलीने 8 गुण गमावले आहेत. विराटचे 887 गुणांवर घसरण झाली आहे. तर रोहितचे 873 गुण झाले आहेत.

रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत शतक आणि 1 अर्धशतक झळकावले. 86 च्या सरासरीने रोहितने 258 धावा केल्या. दुसरीकडे कर्णधार विराटने अखेरच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने 81 चेंडूत 85 धावा केल्या.

या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम तिसर्‍या क्रमांकावर आहे.

तसेच भारताविरूद्धच्या वनडे मालिकेत शानदार फलंदाजी करणाऱ्या शाय होपला पहिल्या दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे. तो आयसीसी वनडे क्रमवारीत 782 गुणांसह 9 व्या स्थानावर पोहोचला आहे.

याबरोबरच गोलंदाजी क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल क्रमांकावर कायम आहे. तसेच वेेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलने 6 स्थानांची प्रगती करत 30 वे स्थान मिळवले आहे.

अष्टपैलू क्रमवारीत इंग्लंडचा बेन स्टोक्स अव्वल क्रमांकावर आहे. मात्र पहिल्या 10 अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत एकाही भारतीय क्रिकेटपटूचा समावेश नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---