आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळालं आहे. ही स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे 4 दिवस उरले आहेत. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी क्रिकेट दिग्गजांकडून भविष्यवाणी केली जात आहे की, भारतीय संघ विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्यासाठी प्रबळ दावेदार असेल. असे असले, तरीही स्पर्धा सुरू झाल्यानंतरच कळेल की, कोणता संघ किती मजबूत आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारताच्या सर्व सामन्यांविषयी जाणून घेऊयात…
भारताचे विश्वचषक 2023मधील सामने
भारतीय संघ (Team India) विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळमार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही संघ विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहेत.
भारतीय संघ या स्पर्धेत एकूण 9 सामने (Team India 9 Matches) खेळणार आहे. यातील पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. तसेच दुसरा सामना 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध दिल्ली येथे खेळला जाणार आहे. भारताचा तिसरा सामना पाकिस्तानविरुद्ध 14 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे खेळला जाईल. या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. यानंतर भारतीय संघ आपला चौथा सामना बांगलादेशविरुद्ध 19 ऑक्टोबर रोजी पुणे (Pune) येथे खेळेल. तसेच, भारताचा पाचवा सामना 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध धरमशाला येथे होणार आहे.
भारताचा अखेरचा सामना नेदरलँडविरुद्ध
याव्यतिरिक्त भारताचा सहावा सामना इंग्लंडविरुद्ध 29 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे खेळला जाईल. सातव्या सामन्यात भारताला श्रीलंकेचे आव्हान असेल. हा सामना 2 नोव्हेंबर रोजी मुंबईत पार पडेल. तसेच, आठवा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे खेळला जाईल. भारत विश्वचषकातील आपला अखेरचा म्हणजेच नववा सामना 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँडविरुद्ध बंगळुरूत खेळेल.
यानंतर 2 उपांत्य सामने आणि अंतिम सामना खेळला जाईल. स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच खेळला जाईल. (icc odi world cup 2023 india will play 9 matches in this CWC23 know here all)
विश्वचषक 2023मधील भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक
8 ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया, ठिकाण- चेन्नई (IND vs AUS, Oct 8, Chennai)
11 ऑक्टोबर- भारत वि. अफगाणिस्तान, ठिकाण- दिल्ली (IND vs AFG, Oct 11, Delhi)
14 ऑक्टोबर- भारत वि. पाकिस्तान, ठिकाण- अहमदाबाद (IND vs PAK, Oct 14, Ahmedabad)
19 ऑक्टोबर- भारत वि. बांगलादेश, ठिकाण- पुणे (IND vs BAN, Oct 19, Pune)
22 ऑक्टोबर- भारत वि. न्यूझीलंड, ठिकाण- धरमशाला (IND vs NZ, Oct 22, Dharamsala)
29 ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड, ठिकाण- लखनऊ (IND vs ENG, Oct 29, Lucknow)
2 नोव्हेंबर- भारत वि. श्रीलंका, ठिकाण- मुंबई (IND vs SL, Nov 2, Mumbai)
5 नोव्हेंबर- भारत वि. दक्षिण आफ्रिका, ठिकाण- कोलकाता (IND vs SA, Nov 5, Kolkata)
12 नोव्हेंबर- भारत वि. नेदरलँड, ठिकाण- बंगळुरु (IND vs NED, Nov 12, Bengaluru)
15 नोव्हेंबर- पहिला उपांत्य सामना, ठिकाण- मुंबई (First Semi-Final, Nov 15, Mumbai)
16 नोव्हेंबर- दुसरा उपांत्य सामना, ठिकाण- कोलकाता (Second Semi Final, Nov 16, Kolkata)
19 नोव्हेंबर- अंतिम सामना, ठिकाण- अहमदाबाद (Final, Nov 19, Ahmedabad)
हेही वाचा-
World Cupमधील पहिल्या सामन्यात उतरताच विराट करणार ‘हा’ भीमपराक्रम, यादीतला टॉपर सचिन तेंडुलकर
विश्वचषकापूर्वी पाऊस जिंकतोय सराव सामने, ऑस्ट्रेलिया-नेदर्लंड लढत अर्ध्यात सुटली