आयसीसी विश्वचषक 2023 भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. आणि स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारताशिवाय पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेदरलँड हे संघ सहभागी झाले आहेत.
सर्व संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळणार असून अव्वल 4 संघ उपांत्य फेरीत जाणार आहेत. बहुतेक सामने मोठ्या धावसंख्येचे होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे आपल्याला फलंदाज खोऱ्याने धावा काढताना दिसतील. आता आपण 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी 3 सामने खेळल्यानंतर सर्वाधिक धावा करणारे अव्वल 5 फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत.
आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज
1. मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान या यादीत अव्वलस्थानी आहे. त्याने आतापर्यंत 3 सामने खेळताना 124च्या शानदार सरासरीने 248 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकाचाही समावेश आहे. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 131 राहिली आहे.
2. डेवॉन काॅनवे (न्यूझीलंड)
न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेवॉन कॉनवे या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. कॉनवेने 3 सामने खेळताना 114.50च्या सरासरीने 229 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 1 शतकही ठोकले आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 152 आहे.
3. क्विंटन डी काॅक (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक हा 229 धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने या धावा 3 सामन्यांमध्ये केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सलग 2 शतके निघाली आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 109 राहिली आहे.
4. रोहित शर्मा (भारत)
रोहित शर्मा (Rohit Sharma) या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 72.33च्या सरासरीने 217 धावा केल्या आहेत. तसेच, त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतकही केले आहे. यादरम्यान त्याची सर्वाधिक धावसंख्या ही 131 राहिली आहे.
5. कुसल मेंडिस (श्रीलंका)
याव्यतिरिक्त कुसल मेंडिस सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. त्याने 3 सामने खेळताना 69च्या सरासरीने 207 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 1 अर्धशतकही निघाले आहे. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 122 राहिली आहे.
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानी आहे, न्यूझीलंड दुसऱ्या, तर साउथ आफ्रिका तिसऱ्या स्थानी आहे. भारताचा या विश्वचषकातील चौथा सामना 19 ऑक्टोबरला पुणे येथे बांगलादेशविरुद्ध खेळला जाणार आहे. (icc odi world cup 2023 top 5 highest run scorer know list)
हेही वाचा-
महत्त्वाच्या सामन्यात अफगाणिस्तानने जिंकला टॉस, न्यूझीलंड संघात ‘हा’ मोठा बदल; पाहा Playing XI
वर्ल्डकपमधून मोठी बातमी! पाकिस्तानने आयसीसीकडे केली भारताची तक्रार; म्हणाला, ‘नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये…’