IND vs AUS Final: पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीला येताच भारताला धक्क्यावर धक्के मिळाले. भारताने पहिल्या तीन विकेट्स गमावत शंभर धावांच्या आत गमावल्या. त्यात शुबमन गिल, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या विकेट्सचा समावेश होता. आता रोहित शर्माच्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
भारताला पहिला धक्का पाचव्या षटकात 30 धावांवर शुबमन गिल (Shubman Gill) याच्या रूपात बसला. तो फक्त 4 धावांवर बाद झाला. शुबमनची विकेट पडल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. रोहित यावेळी चौकार-षटकारांचा पाऊस पाडत होता. मात्र, त्याची वेगाने पुढे जाणारी गाडी ग्लेन मॅक्सवेल याने थांबवली. मॅक्सवेल टाकत असलेल्या दहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहित मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.
रोहित 47 धावांवर बाद
रोहित शर्मा अंतिम सामन्यात चांगल्या लयीत दिसला. त्याने 31 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 47 धावांचा पाऊस पाडला. रोहितला बाद करण्यासाठी कर्णधार पॅट कमिन्स याने मोठा डाव खेळला. त्याने चेंडू मॅक्सवेलच्या हातात सोपवला. मॅक्सवेलच्या दुसऱ्या षटकात रोहितने दमदार अंदाजात पहिल्या 3 चेंडूत 10 धावा केल्या होत्या.
Wow what a catch by Travis Head running backward#WCFINAL#Worlds2023#INDvsAUSfinal pic.twitter.com/d05EQz1sbs
— Sardar Saad (@MSSaad_Saeed) November 19, 2023
What A CATCH 🤯🤯🔥🔥🔥🔥.
Travis Head takes a STUNNER 🥵🥵🔥🔥🔥.#ICCWorldCupFinal #INDvsAUSfinal #CWC2023Final #CWC23 pic.twitter.com/SgFzT8pgZh
— Hassan Siddiqui (@HassanDude77) November 19, 2023
षटकातील चौथ्या चेंडूवरही रोहितने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्याची बॅट हातात फिरली आणि धाव घेत ट्रेविस हेडने झेल (Travis Head Catch) पकडला. रोहितच्या डावाचा शेवट करण्यात जेवढे योगदान मॅक्सवेलच्या चेंडूचे होते, तेवढेच क्षेत्ररक्षक ट्रेविस हेडचेही राहिले. हेडने 11 मीटर लांब धाव घेतली आणि हवेत झेप घेत रोहितचा शानदार झेल पकडला. हेडचा हा झेल सामन्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. (icc odi world cup final 2023 video ind vs aus travis head excellent catch to dismiss skipper rohit sharma on glenn maxwell bowl)
हेही वाचा-
World Cup Final: आक्रमक सुरुवातीनंतर रोहित अन् श्रेयस लागोपाठ तंबूत, विराट मैदानात उभा
WC Finalचा निकाल लागण्यापूर्वीच युवराजने निवडला आपला Player of the Tournament, रोहित-विराटला दिला धक्का