---Advertisement---

आयसीसीच्या मानाच्या पुरस्कारासाठी मयंकला मिळाले नामांकन, ‘या’ दोघांशी करावी लागणार स्पर्धा

On: रविवार, जानेवारी 9, 2022 6:10 AM
mayank-agarwal
---Advertisement---

आयसीसीने (ICC) डिसेंबर २०२१ मधील सर्वोत्तम प्रदर्शन करणारे तीन खेळाडू निवडले आहेत. आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ (ICC player of the month) पुरस्कारासाठी या तिघांना नामांकन मिळाले आहे. भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याने मागच्या महिन्यात चांगले प्रदर्शन कले होते, या प्रदर्शनच्या जोरावर त्याने या पुरस्कारासाठी नामांकन मिळवले आहे. त्यव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि न्यूझीलंडच्या एजाज पटेल (Ajaz Patel) यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

भारतीय संघाचा नियमित सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (rohit sharma) याच्या अनुपस्थितीत मयंक अगरवालने मागच्या दोन मालिकांमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले. रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळली, तसेच सध्या भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत देखील रोहित उपस्थित नाही. रोहितच्या जागी या दोन्ही मालिकांमध्ये मयंक अगरवालने संघात पुनरागमन केले आणि अप्रतिम फलंदाजी करून दाखवली. न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबईत पार पडलेल्या कसोटी सामन्यात त्याने १५० धावांची तुफानी खेळी केली होती. तसेच दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सेंचुरियन कसोटीत ६२ धावा ठोकल्या होत्या. आता त्याच्या या प्रदर्शनाची दखल आयसीसीने घेतल्याचे दिसते.

न्यूझीलंडचा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज एजाज पटेलने मुंबईत खेळलेल्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. या डावखुऱ्या गोलंदाजाने मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाच्या सर्व विकेट्स एकट्याने घेतल्या. एका डावात १० विकेट्स घेऊन एजाज पटेलने इतिहास रचला. पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावात देखील एजाजने कमाल प्रदर्शन करत तब्बल चार विकेट्स घेतल्या. एकंदरित पाहता या सामन्यात त्याने न्यूझीलंडसाठी १४ विकेट्स घेतल्या आणि सामना संपवला.

आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी तिसरा दावेदार आहे ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या ऍशेस मालिका खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि यामध्ये मिचेल स्टार्कचे योगदान मोलाचे राहिले आहे. स्टार्कने या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये १९.४ च्या सरासरीने १४ विकेट्स नावावर केल्या. त्याचसोबत फलंदाजीमध्ये ५८.५ च्या सरासरीने ११७ धावा केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या –

आयसीसीच्या नव्या टी२० नियमांवर भलताच खूश झाला भारतीय दिग्गज; म्हणाला…

PHOTOS: जेसन रॉय दुसऱ्यांदा बनला ‘बाबा’; शेअर केले ‘हॅप्पी’ फॅमिलीचे फोटो

इमर्जन्सीमध्ये यष्टिरक्षणाला उतरला आणि केली विश्वविक्रमाची बरोबरी! ओली पोपचा कारनामा

व्हिडिओ पाहा –

टोकियो ऑलिम्पिक... भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा | India at Tokyo Olympics 2020

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---