आंतरराष्ट्रीय क्रिकेट कांउसिल अर्थात आयसीसीने एप्रिल २०२२ साठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ (महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू) (ICC Player Of Month) च्या उमेदवारांची घोषणा केली आहे. एप्रिल महिन्यातील (April 2022) आपल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर काही पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी या पुरस्कारासाठी आपला दावा ठोकला आहे. आयसीसीने मंगळवारी (०३ मे) या नावांची घोषणा केली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज (Keshav Maharaj) आणि सायमन हार्मर (Simon Harmer) यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच त्यांच्याव्यतिरिक्त ओमानच्या जतिंदर सिंगचेही (Jatinder Singh) नाव यादीत आहे. महिला क्रिकेटपटूंमध्ये ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली (Alyssa Healy), इंग्लंडची नताली सीवर (Nat Sciver) आणि युगांडाच्या म्बाबाजी (Mbabazi) यांचा समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने एप्रिल महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत धाकड गोलंदाजी प्रदर्शन केले होते. त्याने या २ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. दक्षिण आफ्रिका संघाने बांगलादेशला दोन्हीही कसोटी सामन्यात पराभूत करत त्यांना मालिकेत क्लिन स्वीप केले होते.
Two superstars that featured in the #CWC22 final and a Uganda all-rounder are your April ICC Women's Player of the Month nominees!
How they earned their spot ⬇️https://t.co/aP4KjP3pvS
— ICC (@ICC) May 4, 2022
केशव महाराजव्यतिरिक्त सायमन हार्मरनेही जबरदस्त खेळ दाखवला. ६ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना त्याने प्रभावशाली प्रदर्शन केले. डर्बन कसोटीत त्याने बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात नाबाद ३८ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने ४ विकेट्सही घेतल्या. पुढे केशव महाराजला साथ देत त्याने दुसऱ्या डावात ३ विकेट्सही घेतल्या. दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने दोन्ही डावात मिळून ६ विकेट्स काढल्या.
A South African spin duo and a dashing Oman opener are your April ICC Men's Player of the Month nominees!
More on their exploits 👇https://t.co/jUWPccZ72w
— ICC (@ICC) May 4, 2022
ओमानकडून क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या जतिंदर सिंगनेही फलंदाजीत प्रभावशाली खेळ दाखवला. एप्रिलमध्ये दुबईत स्कॉटलँड आणि पीएनजी संघांविरुद्ध झालेल्या तिरंगी मालिकेत तो शानदार फॉर्ममध्ये होता. ही मालिका आयसीसीच्या क्रिकेट विश्वचषक लीग २ चा भाग होती. त्याने या मालिकेतील ४ सामन्यांमध्ये २५९ धावा बनवल्या. त्याच्या या खेळीत एका शतकाचाही समावेश होता. अशाप्रकारे त्याने धाकड खेळ दाखवत प्लेयर ऑफ द मंथसाठी उमेदवारी मिळवली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा