क्रिकेट हे तीन प्रकारात खेळलं जातं. कसोटी, वनडे आणि टी20 क्रिकेट. सुरुवातीला फक्त कसोटी क्रिकेट सामने खेळले जायचे. एकापेक्षा जास्त दिवस खेळले जात असल्यामुळे काळानुसार प्रेक्षकांमध्ये कसोटी सामन्यांचे आकर्षण कमी होत होते. याव्यतिरिक्त पाच दिवसांच्या सामन्यात अनिर्णित निकालासारखे परिणामही प्रेक्षकांची संख्या कमी होण्याचे कारण बनत होते. अशा कठीण काळात वनडे आणि नंतर टी20 क्रिकेट आल्याने फक्त सामन्यातील रोमांच वाढला नाही, तर प्रेक्षकांची संख्या आणि कमाईतही अनेक पटींनी वाढ झाली आहे. फलंदाजांच्या शैलीत आलेल्या अनेक बदलांमुळेही आता सुरुवातीच्या तुलनेत कसोटी सामन्यांचे जास्त निकाल लागताना दिसत आहेत. याव्यतिरिक्त काळानुसार नियमांमध्येही वेगवेगळे बदल झाले. त्यापैकीच एक म्हणजे पॉवरप्ले.
पहिला वनडे आणि टी20 सामना
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघात 5 जानेवारी, 1971 रोजी पहिला वनडे सामना खेळला गेला. तसेच, 17 फेब्रुवारी, 2005 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला गेला. वनडे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये सर्वात आधी 1996च्या विश्वचषकात पॉवरप्ले नियम (Powerplay Rule) वापरण्यात आला होता. पॉवरप्ले नियमामुळे खेळात जास्त धावा बनल्या जाऊ लागल्या आणि रोमांचही खूपच वाढला.
आधी 15 षटकांचा असायचा पॉवरप्ले
सुरुवातीला पॉवरप्लेसाठी 15 षटके ठेवली जायची. यादरम्यान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 30 यार्डाच्या वर्तुळाबाहेर अधिकाधिक 2 खेळाडू ठेवण्याची परवानगी होती. हा नियम आल्यानंतर 15 षटकात खूप धावा निघू लागल्या, पण मधल्या षटकांमध्ये धावांची गती कमी झाल्यामुळे खेळ कंटाळवाणा होऊ लागला. हे लक्षात घेत 2005मध्ये नवीन पॉवरप्ले (Powerplay) नियम अंमलात आणला गेला.
नवीन पॉवरप्लेमध्ये 20 षटके
नवीन पॉवरप्ले जुन्या पॉवरप्ले नियमाचा विस्तार आहे, जो 15 षटकांवरून वाढत 20 षटकांचा करण्यात आला. एवढंच नाही, तर या 20 षटकांना 3 भागात विभागण्यात आले. बंधनकारक पॉवरप्ले आणि 5-5 षटकांचे दोन इतर पॉवरप्ले, अशी पॉवरप्लेची विभागणी करण्यात आली. पहिली 10 षटके बंधनकारक पॉवरप्लेची असतात, ज्यामध्ये गोलंदाजी करणारा संघ 2 खेळाडूच 30 यार्डाच्या वर्तुळाबाहेर ठेवू शकतात. दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये अधिकाधिक 4 खेळाडू वर्तुळाच्या बाहेर ठेवणे गरजेचे आहे. तसेच, तिसऱ्या पॉवरप्लेमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अधिकाधिक 5 खेळाडू वर्तुळाच्या बाहेर ठेवू शकतात.
सन 2008मध्ये एक पॉवरप्ले फलंदाजी करणाऱ्या संघाला
सन 2008मध्ये 2005च्या निर्णयात बदल करत 5 षटकांच्या 2 पॉवरप्लेपैकी एक फलंदाजी करणाऱ्या संघाला दिला गेला. याला बॅटिंग पॉवरप्ले नाव देण्यात आले. यातील बदलाचे प्रमुख कारण मधल्या षटकात धावा करण्याच्या गतीमध्ये वेग आणणे होते. हे लक्षात घेत काही संघांनी अखेरच्या षटकातच बॅटिंग पॉवरप्लेचा वापर करण्याचा पर्याय निवडला. आयसीसीने 2011मध्ये हे बंधनकारक केले की, बॅटिंग आणि बॉलिंग, दोन्ही पॉवरप्ले 16 ते 36 षटकांमध्ये घेतले गेले पाहिजे.
बॅटिंग पॉवरप्लेचा नियम आयसीसीने हटवला
तसंं पाहिलं, तर 2015च्या विश्वचषकानंतर आयसीसीने बॅटिंग पॉवरप्ले नियम काढून टाकला. आता पूर्वीप्रमाणे तीन पॉवरप्ले क्रिकेटमध्ये आहेत, जे 1 ते 10, 11 ते 40 आणि 41 ते 50 षटकांमध्ये वापरला जाऊ शकतो.
टी20त पहिल्या सहा षटकांचा असतो पॉवरप्ले
टी20 क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये एकच पॉवरप्ले असतो. या पॉवरप्लेचा वापर सुरुवातीच्या 1-6 षटकांमध्ये केला जातो. या पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणारा संघ अधिकाधिक 2 खेळाडूच 30 यार्डाच्या वर्तुळाबाहेर ठेवू शकतात. तसेच, उर्वरित 14 षटके म्हणजेच 7 ते 20 षटकांमध्ये गोलंदाजी करणारा संघ अधिकतर 5 खेळाडू 30 यार्डाच्या वर्तुळाबाहेर ठेवू शकतात. (ICC power play rule of odi and t20 cricket how many changes happened know here)
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! IPL Final गाजवणारा पठ्ठ्या TNPLमध्ये करतोय राडा, कुणीच रोखणार नाही टीम इंडियातील एन्ट्री?
जडेजाने शेअर केला ‘फॉरएव्हर क्रश’सोबतचा फोटो; नेटकरीही म्हणाला, ‘भावा, घोड्याला जोरात…’