---Advertisement---

इकडं सूर्या भाऊंची बॅट तळपली अन् तिकडं पाकिस्तानी फलंदाजाचं टेन्शन वाढलं, टी20 रँकिंगमध्ये घेतली गरुडझेप

On: बुधवार, ऑक्टोबर 5, 2022 7:58 PM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील टी20 मालिका संपली. त्यानंतर पाकिस्तान आणि इंग्लंड संघातील टी20 मालिका संपल्यानंतर आयसीसीकडून नवीन क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याला नुकत्याच झालेल्या मालिकेतील प्रदर्शनासाठी खास बक्षीसही मिळाले आहे. तो आता अव्वल स्थानाच्या खूपच जवळ पोहोचला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवान हा फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. मात्र, सूर्या आणि रिझवान यांच्यातील अंतर फक्त 16 गुण इतकेच आहे. रिझवानचे 854 गुण आहेत, तर सूर्याचे आता 838 गुण झाले आहेत.

विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादव याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. शेवटचा सामना सोडला, तर त्याने सुरुवातीच्या दोन सामन्यात अर्धशतक झळकावले होते. त्याने तीन सामन्यात 59.50च्या सरासरीने 119 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 2 अर्धशतकेही झळकावली. 32 वर्षीय सूर्याकडे आता टी20 विश्वचषकादरम्यान रिझवानच्या पुढे जाण्याची संधी असेल. आता तो ज्या फॉर्मात आहे, ते पाहता कदाचित हे त्याच्यासाठी कठीण नसेल.

रिझवानच्या पुढे जाऊ शकतो सूर्यकुमार
रिझवानबद्दल बोलायचं झालं, तर त्यानेही इंग्लंडविरुद्ध सात सामन्यांच्या मालिकेत ताबडतोब फलंदाजी करत 316 धावा चोपल्या. तसेच, तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. मात्र, त्याला सहाव्या सामन्यातून बाहेर असल्यामुळे आणि शेवटच्या सामन्यात फक्त 1 धाव केल्यामुळे महत्त्वाचे गुण गमवावे लागले. आयसीसीनुसार, जर सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही चांगली कामगिरी केली असती, तर तो रिझवानच्याही पुढे जाऊ शकला असता.

फलंदाजांमध्ये राहुलला सात स्थानांचा फायदा
नवीन टी20 आकडेवारीमध्ये (T20 Ranking) मोहम्मद रिझवान पहिल्या स्थानावर आहे, तर सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच, पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्करम चौथ्या आणि डेव्हिड मलान पाचव्या स्थानी कायम आहे. भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर सलामीवीर केएल राहुल याला सात स्थानांचा फायदा झाला असून तो 14व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्याव्यतिरिक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना नुकसान सहन करावे लागले आहे. क्रमवारीत फायदा झालेल्या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचे क्विंटन डी कॉक (8 स्थानांच्या फायद्यासह 12व्या क्रमांकावर), रायली रूसो (23 स्थानांच्या फायद्यासह 20व्या क्रमांकावर), तर डेव्हिड मिलर (10 स्थानांच्या फायद्यासह 29व्या क्रमांकावर) यांचा समावेश आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजवर रोमांचक विजय; फिंचची ‘कॅप्टन्स इनिंग’
पेढे वाटा पेढे! अजिंक्य रहाणे पुन्हा बनला बापमाणूस, लेकीच्या वाढदिवशीच झाला गोंडस मुलाचा जन्म

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---