भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी इंग्लंडवर पाच विकेट राखून विजय मिळवला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. तर या विजयासह टीम इंडियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. याबरोबरच ICC ने बुधवार 28 फेब्रुवारीला कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीतील ताज्या कसोटी क्रमवारीत भारताच्या उगवत्या ताऱ्यांची ताकद दिसून आली आहे.
कसोटी क्रमवारीत रांची कसोटीत विजयाचा हिरो ठरलेला सामनावीर ध्रुव जुरेलने क्रमवारीत प्रगती केली आहे. तर शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनाही ताज्या कसोटी क्रमवारीत फायदा झाला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माला देखील एक स्थान गमवावे लागले आहे. तसेच विराट कोहली देखील घसरण झाली आहे.
अशातच भारताकडून केवळ दोन कसोटी सामने खेळून प्रसिद्धीझोतात आलेल्या ध्रुव जुरेलने 31 स्थानांची झेप घेतली आहे. रांची कसोटीनंतर तो 100व्या स्थानावरून 69व्या स्थानावर पोहोचला आहे. शुभमन गिल आता चार स्थानांच्या प्रगतीसह 31व्या स्थानावर पोहोचला आहे. यशस्वी 12 व्या स्थानावर आहे तर रोहित शर्मा एका स्थानाच्या नुकसानासह 13 व्या स्थानावर आला आहे.
India and England stars rise in the latest ICC Test Player Rankings 📈https://t.co/wZltapMRzf
— ICC (@ICC) February 28, 2024
याबरोबरच सध्या कसोटी क्रिकेट जास्त खेळले जात आहे. त्यामुळे कसोटी क्रमवारीत वारंवार बदल होत आहेत. तर ताज्या क्रमवारीत केन विल्यमसनही अव्वल स्थानावर आहे. तसेच, 31वे कसोटी शतक झळकावणारा जो रूट तिसऱ्या स्थानावर आला आहे. यामध्ये यशस्वी जयस्वाल सध्याच्या भारतीय संघातील अव्वल आहे. तर जयस्वालने ताज्या कसोटी क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेत 12व्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच अव्वल 10 मध्ये विराट कोहली एकमेव भारतीय आहे, जो दोन स्थानांच्या नुकसानासह 9व्या स्थानावर आहे.
Top 5 Highest Ranked Indian Batter in ICC Test Rankings:
1. Virat Kohli (9).
2. Yashasvi Jaiswal (12).
3. Rohit Sharma (13).
4. Rishabh Pant (14).
5. Shubman Gill (31). pic.twitter.com/cgXESwFQA5— Tanuj Singh (@ImTanujSingh) February 28, 2024
दरम्यान, गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल, रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर रवींद्र जडेजा सहाव्या स्थानावर आहे. तसेच अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल आणि रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर अक्षर पटेलला एका स्थानाचे नुकसान झाले असून तो चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- कसोटी सामन्याचे अखेरच्या क्षणी अचानक बदलले ठिकाण! कारण जाणून व्हाल थक्क
- IND Vs ENG : पाचव्या कसोटीपूर्वी भारतीय संघासाठी खुशखबर, ‘या’ धाकड खेळाडूचे संघात पुनरागमन