---Advertisement---

अर्रर्र! इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना न खेळल्याने बुमराहला मोठा धक्का, आयसीसी वनडे क्रमवारीत नुकसान

Jasprit-Bumrah
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामना आणि इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात वनडे मालिका पार पडली. यानंतर आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आज (२० जुलै) वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. भारताने जरी इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकली असली तरी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या क्रमवारीत नुकसान झाले आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्य क्रमवारीत गोलंदाजीत प्रथम स्थानावर असलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याला इंग्लंड विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विश्रांती दिली होती. या कारणास्तव त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे. तर पहिल्या स्थानावर पुन्हा एकदा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) परतला आहे. बोल्टचे ७०४ गुण आहेत तर बुमराहचे ७०३.

बुमराह एका स्थानानी खाली आला तर त्याचा संघसहकारी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला चार स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता १६व्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने अष्टपैलूच्या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये प्रवेश करत ८व्या स्थानावर आला आहे. चहलने इंग्लंड विरुद्ध ६ विकेट्स घेतल्या होत्या, तर पंड्याने १०० धावा करत ६ विकेट्स घेतल्या आहेत.

या मालिकेत नाबाद शतकी खेळी करणारा भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याने क्रमवारीत मोठी उडी घेतली आहे. त्याने नाबाद १२५ धावा केल्याने २५ स्थानांनी पुढे जात ५२वे स्थान गाठले आहे. पंड्याही फलंदाजांच्या क्रमवारीत ४२व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याला आठ स्थानांचा फायदा झाला आहे.

या क्रमवारीत बुमराह बरोबरच विराट कोहली (Virat Kohli) आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांनाही नुकसान झाले आहे. ते दोघेही एक-एक स्थानांनी खाली आले आहेत. विराट चौथ्या तर रोहित पाचव्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यात मंगळवारी (१९ जुलै) झालेल्या सामन्यात रस्सी वान दर दुसेननने शतकी खेळी केली आहे. त्याला तीन स्थानांचा फायदा झाला असून तो तिसऱ्या स्थानी आला आहे. या क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर कायम आहे. तर दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा इमाम उल हक आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

विराट कोहलीवर नामुष्कीची वेळ, फॉर्ममध्ये परतण्यासाठी निवडकर्त्यांचा अजब प्लॅन

आता बीसीसीआयचा कारभार सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश चालवणार, वाचा काय आहे प्रकरण

‘जलवा है हमारा!’ इंग्लंडविरुद्ध शतक झळकावणारा पंत आता ट्विटरवरही करतोय हवा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---