---Advertisement---

महिला वनडे रँकिंग टाॅप-१०मध्ये स्म्रीती मंधानाचा कमबॅक, पण कोणत्या स्थानी आहेत मिताली राज आणि झुलन गोस्वामी?

Cricketer Smriti Mandhana
---Advertisement---

सध्या सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकातील कामगिरीनंतर महिला एकदिवसीय गुणतालिकेत सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधानाला फायदा झाला आहे. मंधाना आता पुन्हा एकदा फलंदाजांच्या यादीत पहिल्या १० क्रमांकांमध्ये आली आहे. मंधानाचे रेंटिंग पाॅइंट्स ६६३ झाले आहेत. ती आता आयसीसी गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर कर्णधार मिताली राज या यादीत सातव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिचे रेटिंग पाॅइंट्स ६९६ आहेत. 

मंधाना (Smriti Mandhana) या अगोदर पहिल्या १०मधून बाहेर झाली होती, परंतु आता तिने पुन्हा एकदा या गुणतालिकेत टाॅप १० मध्ये स्थान मिळवले आहे. मंगळवारी (२२ मार्च) बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात मंधानाने ३० धावा केल्या. तिच्याशिवाय मितालीसुद्धा पहिल्या १० खेळाडूंमध्ये आहे.

गोलंदाजी रँकिंगमध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचे सुद्धा नुकसान झाले आहे. झुलन एका क्रमांकाने खाली आली असून सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिचे रेटिंग पाॅइंट्स ६७४ आहेत. आयसीसी अष्टपैलूंच्या गुणतालिकेत पहिल्या १०मध्ये असणारी झुलन एकमेव भारतीय महिला आहे. बांग्लादेशविरुद्ध ४ विकेट्स घेणारी स्नेह राणा ४९व्या क्रमांकावर आहे, तर दीप्ती शर्मा १७व्या क्रमांकावर आहे. तसेच, राजेश्वरी गायकवाड १४व्या क्रमांकावर आहे.

इतर संघांतील खेळाडूंबद्दल बोलायचे झाले, तर टाॅप १० फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली ७३० रेटिंग पाॅइंटसह पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वाॅलवार्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग चौथ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन पहिल्या, तर ऑस्ट्रेलियाची जीस जोनासन दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाची मेगन शट तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय संघाने आयसीसी महिला विश्वचषकात ४ सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांग्लादेशविरुद्ध संघाने विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बांगलादेशवरील विजयानंतर भारताची टॉप-३मध्ये उडी, सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी अशी आहेत गणिते

सलग १८ पराभवांनंतर पाकिस्तानने चाखला विजयाचा स्वाद, कर्णधाराने मुलीसोबत साजरा केला आनंद

VIDEO: लेकीसंगे डान्स, कॅमेरामॅनसोबत मस्ती; ‘हिटमॅन’ रोहितची कधीही न पाहिलेली बाजू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---