---Advertisement---

संपूर्ण यादी: पुढील पाच वर्षांचे भारतीय संघाचे वेळापत्रक घोषित

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 20 जूनला पुरुषांच्या क्रिकेटमधील 2018-2023 या दरम्यानचा भविष्यातील कार्यक्रम घोषित केला आहे.

यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांच्या सामन्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे मुख्य लक्ष द्विपक्षिय क्रिकेटकडे असणार आहे.

या भविष्यातील कार्यक्रमात सर्व संघाच्या वेळापत्रकाचा समावेश आहे. भारत या कालावधीत 69 टी20, 83 वनडे आणि 51 कसोटी सामने खेळणार आहे.

भारतीय संघ यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात 2 टी20 सामने खेळण्यासाठी आयरलँडला जाणार आहे. त्यानंतर लगेचच तिथूनच इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ 3 वनडे, 3 टी20 आणि 5 कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर आशिया चषक होणार आहे. याचबरोबर भारत वर्षाच्या शेवटी आॅस्ट्रेलियाचा महत्त्वाचा दौराही करणार आहे.

या 5 वर्षात भारत जवळजवळ 10 परदेश दौरे करणार असुन यात इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, विंडीज, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश दौऱ्यांचा समावेश आहे.

तसेच मायदेशात भारतीय संघ पुढील 5 वर्षात झिम्बाब्वे, आॅस्ट्रेलिया, विंडीज, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या विरुद्ध खेळणार आहे.

त्याचबरोबर या 5 वर्षात कसोटी चॅम्पियनशिप आणि वनडे लीगचाही समावेश आहे. तसेच 2019 आणि 2013 ला वनडे विश्वचषक तर 2020 आणि 2021 ला टी 20 विश्वचषक होणार आहे.

असे आहे पुढील 5 वर्षांसाठी भारतीय संघाचे वेळापत्रक:

2018:

जून: आयरलँड दौरा (2 टी20)

जुलै-सप्टेंबर: इंग्लंड दौरा (3 वनडे, 3 टी20 आणि 5 कसोटी)

सप्टेंबर: आशिया चषक

आॅक्टोबर-नोव्हेंबर: विंडीजचा भारत दौरा (3 कसोटी, 5 वनडे, 3टी20)

नोव्हेंबर 2018-जानेवारी 2019: आॅस्ट्रेलिया दौरा (4 कसोटी, 3 वनडे, 3टी20)

2019:

जानेवारी-फेब्रुवारी: न्यूझीलंड दौरा (5 वनडे, 3 टी20)

फेब्रुवारी-मार्च: आॅस्ट्रेलियाचा भारत दौरा (5 वनडे, 2 टी20)

मार्च-एप्रिल:  झिम्बाब्वेचा भारत दौरा (1 कसोटी 3 वनडे)

मे-जुलै: वनडे विश्वचषक

जुलै-आॅगस्ट: विंडीज दौरा  (2 कसोटी, 3 वनडे, 3टी20)

आॅक्टोबर-नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा(3 कसोटी)

नोव्हेंबर-डिसेंबर: बांग्लादेशचा भारत दौरा (2 कसोटी, 3टी20)

डिसेंबर: विंडिजचा भारत दौरा (3वनडे, 3टी20)

2020:

जानेवारी: आॅस्ट्रेलियाचा भारत दौरा (3वनडे)

फेब्रुवारी-मार्च: न्यूझीलंड दौरा (2 कसोटी, 3 वनडे, 5 टी20)

मार्च: दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा (3वनडे, 3टी20)

जून-जुलै: श्रीलंका दौरा (3वनडे, 3टी20)

आॅगस्ट: झिम्बाब्वे दौरा(3वनडे)

सप्टेंबर: आशिया चषक

आॅक्टोबर: इंग्लंडचा भारत दौरा (3वनडे, 3टी20)

आॅक्टोबर: आॅस्ट्रेलिया दौरा (3 टी 20)

आॅक्टोबर-नोव्हेंबर: टी20 विश्वचषक (आॅस्ट्रेलिया)

नोव्हेंबर2020-जानेवारी2021: उरलेला आॅस्ट्रेलिया दौरा (4 कसोटी, 3 वनडे)

2021:

जानेवारी-मार्च:  इंग्लंडचा भारत दौरा (5 कसोटी)

मार्च: अफगाणिस्तानचा भारत दौरा (3 वनडे)

जून: कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी

जुलै: श्रीलंका दौरा (3 टी20)

जुलै-सप्टेंबर: इंग्लंड दौरा (5 कसोटी)

आॅक्टोबर: दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा (3 वनडे, 3 टी20)

आॅक्टोबर-नोव्हेंबर: टी20 विश्वचषक

नोव्हेंबर-डिसेंबर: न्यूझीलंडचा भारत दौरा (2 कसोटी, 3 टी20)

डिसेंबर2021-जानेवारी2022: दक्षिण आफ्रिका दौरा (3 कसोटी, 3टी20)

2022:

जानेवारी-फेब्रुवारी: विंडिजचा भारत दौरा(3 वनडे, 3 टी20)

फेब्रुवारी-मार्च: श्रीलंकेचा भारत दौरा (3 कसोटी, 3 टी20)

मार्च: न्यूझीलंड दौरा (3 वनडे)

जुलै: इंग्लंड दौरा (3 वनडे, 3 टी20)

आॅगस्ट: विंडिज दौरा (3 वनडे, 3 टी20)

सप्टेंबर: आशिया चषक

आॅक्टोबर-नोव्हेंबर: आॅस्ट्रेलियाचा भारत दौरा (4 कसोटी, 3 टी20)

नोव्हेंबर: बांग्लादेश दौरा (2 कसोटी, 3 वनडे)

डिसेंबर2022-जानेवारी2023: श्रीलंकेचा भारत दौरा (5 वनडे)

2023:

जानेवारी: न्यूझीलंडचा भारत दौरा (3 वनडे)

जानेवारी-फेब्रुवारी: आॅस्ट्रेलियाचा भारत दौरा (3 वनडे)

फेब्रुवारी-मार्च: वनडे विश्वचषक (भारत)

महत्त्वाच्या बातम्या:

गांगुली म्हणतो; या गोलंदाजाने अनिल कुंबळेच्या संपर्कात रहायला हवे!

भयंकर चिडलेल्या रोहित शर्माचा टीकाकार आणि माध्यमांवर पलटवार!

कर्णधार विराट कोहलीशी तुलना होणारा तो फलंदाज डोप टेस्टमध्ये दोषी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment