दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू हर्षल गिब्जने 2007 विश्वचषकात आजच्याच दिवशी 6 षटकार मारले होते. नेदरलॅंडविरुद्ध खेळताना त्याने ही कामगिरी केली होती.
डॅन वॅन बंगो हा गोलंदाज जेव्हा डावातील 30वे षटकं टाकत होता तेव्हा गिब्जने हा कारनामा केला होता. 30 चेंडूत 32 धावांवर खेळणाऱ्या गिब्जच्या 30व्या षटकाच्या शेवटी 36 चेंडूत 68 धावा झाल्या होत्या.
एवढी चांगली खेळी करुनही गिब्जला मोठी खेळी उभारता आली नाही. तो 31व्या षटकातचं 40 चेंडूत 72 धावा करुन परतला.
Watch his 🔥 hits here: pic.twitter.com/DK7rhALp1f
— ICC (@ICC) March 16, 2020
Watch his 🔥 hits here: pic.twitter.com/DK7rhALp1f
— ICC (@ICC) March 16, 2020
त्यानंतर 7 महिन्यांनी सप्टेंबर 2007मध्ये युवराजने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्राॅडला एकाच षटकात 6 षटकार मारत या विक्रमाची बरोबरी केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
– टीम इंडियाचा सदस्य नसलेला धोनी खेळतोय हा खेळ
– जड्डूला सर म्हटल्यावर नक्की वाटतं तरी काय?
– गोष्ट एका क्रिकेटरची: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या…